जनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:27+5:30

मंगळवारी जिल्हाभरात तब्बल १४९ नवीन रुग्णांची भर पडली. त्यातील ६७ जण गडचिरोली शहरातील आहेत. दरम्यान क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ४४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या ७५८ झाली आहे. आतापर्यंत बाधित २ हजार ७११ रूग्णांपैकी १ हजार ९३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र २० जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले.

234 patients added in Gadchiroli in seven days of public curfew | जनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर

जनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर

ठळक मुद्देजिल्ह्यात १४९ नव्याने कोरोनाबाधित : शहरातील जनता कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस; सात दिवस व्यापाऱ्यांसह नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात वाढत असलेली कोरोनारुग्णांची संख्या पाहता गेल्या बुधवार (दि.२३) ते बुधवार (३०) असा आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ पाळला जात आहे. त्यातील सात दिवस पूर्ण झाले. पण या कालावधीतही रुग्णसंख्या आटोक्यात न येता वाढतीवरच असून सात दिवसात शहरात २३४ रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्हाभरात तब्बल १४९ नवीन रुग्णांची भर पडली. त्यातील ६७ जण गडचिरोली शहरातील आहेत.
दरम्यान क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ४४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या ७५८ झाली आहे. आतापर्यंत बाधित २ हजार ७११ रूग्णांपैकी १ हजार ९३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र २० जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले.
नवीन १४९ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील ६७ जण आहेत. त्यामध्ये गडचिरोली शहरातील १२, विसोरा येथील १, गणेश कॉलनीमधील १, रामनगर येथील ३, रेड्डी गोडावून कॅम्प एरिया २, बजरंग नगर १, बेलगाव १, कॅम्प एरिया येथील २, कॅम्प एरिया रामपुरी वार्ड येथील २, गोकुल नगर येथील २, इंदिरा नगर १, कन्नमवार वार्ड येथील २, कुठेगांव येथील १, लांजेडा येथील २, मारकाबोडी येथील १, मेडिकल कॉलनी येथील ५, गोकुलनगर गणेश मंदिराजवळ १, पोलीस हेडक्वार्टर येथील ३, पोर्ला येथील १, रामनगर येथील ७, सर्वोदय वॉर्ड येथील २, सोनापूर कॉम्प्लेक्स १, विसापूर पोस्ट पार्डी १, विवेकनंद नगर येथील २, झांसीराणी नगर येथील १ आणि दुसºया जिल्ह्यांमधील १० अशा एकूण ६७ जणांचा समावेश आहे.
अहेरी तालुक्यातील ७, तसेच आरमोरी तालुक्यातील ९ यामध्ये भाकरोंडी येथील १, डार्ली येथील १, पोकोरा येथील १, विद्यानगर बर्डी येथील १, तर ५ शहरातील आहेत. भामरागड तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे. यामध्ये कोठी येथील ५ जण, हिनभट्टा येथील १, व भामरागड शहरातील १ जण आहे. चामोर्शी येथील ९ जणांचा समावेश आहे. यामध्ये चामोर्शी शहरातील ५ जण आहेत. आष्टीमधील २, तळोधी १, वाघोली १ जणांचा समावेश आहे. धानोरा येथील १६ जणांचा समावेश आहे. यामध्ये धानोरा शहर १, गोडलवाही येथील ३, कारवाफा १, पोलीस स्टेशन चातगाव येथील ८ जण, सावंगा येथील १, सिंदेसुर येरकडा येथील १, सोडे येथील १ जण, एटापल्ली तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. यामध्ये हालेवारा येथील १ सीआरपीएफ जवान, एटापल्ली टीचओ १, एटापल्ली शहरातील ३, हेडरी येथील १ जणाचा समावेश आहे. कोरची येथील ५ जणांचा समावेश आहे. यामध्ये देवंडी १, कोहका कोटगुल १, कोरची शहरातील २, नांदली येथील १ जण, कुरखेडा येथील ४ जण यामध्ये लोढोर पो. पुराडा येथील १, पुराडा १, तलेगाव १, येंगलखेडा १ जण, मुलचेरा येथील ३ जण यामध्ये बोलेपल्ली येथील १ व मुलचेरा शहरातील २ जणांचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील १६ जणांचा समावेश असून यामध्ये आंबेडकर वार्ड १, वडसा येथील १, चोप येथील १, सीआरपीएफ कॅम्प येथील ५, गांधी वार्ड येथील १, हनुमान वार्ड १, पोलीस स्टेशन १, शिवाजी वार्ड येथील १, तुलशी येथील १, विसोरा येथील १, वडसा शहरातील २ अशा एकूण १४९ जणांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी ४४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २४, अहेरी ३, आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा २, मुलचेरा १, सिरोंचा १, कोरची १ यांचा समावेश आहे.
 

Web Title: 234 patients added in Gadchiroli in seven days of public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.