मोहझरी जंगल परिसरात २३ क्विंटल मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST2021-04-13T04:35:17+5:302021-04-13T04:35:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गडचिरोली पोलीस व मुक्तिपथने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. गडचिरोली पोलीस ठाणे ...

मोहझरी जंगल परिसरात २३ क्विंटल मोहसडवा नष्ट
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गडचिरोली पोलीस व मुक्तिपथने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. गडचिरोली पोलीस ठाणे व मुक्तिपथ तालुका चमूने तालुक्यातील त्रासदायक गावांची यादी तयार केली होती. या यादीत मोहझरी गावाचाही समावेश आहे. त्यानुसार, मोहझरी जंगल परिसरात अहिंसक कृती करण्यात आली. गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, नाल्यालगत विविध ठिकाणी टाकला असलेला जवळपास २३ क्विंटल मोहसडवा व साहित्य आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई एएसआय मुनिश्वर मेश्राम, बिट अंमलदार भुवनेश्वर गुरनुले, पोलीस हवालदार रायपुरे व होमगार्डच्या पथकाने केली आहे. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, पोर्लाचे ग्रा.पं. सदस्य भास्कर लाडवे, नवरगावचे पोलीस पाटील राजहंस जांभुळकर, उपसरपंच आशा भोयर उपस्थित होते.
बाॅक्स
नगरी परिसरातही फाेफावला व्यवसाय
गडचिराेली तालुक्यात माेहझरी गावात माेठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात आहे. त्यातच नगरी गावातही काही नवीन विक्रेत्यांनी दारूविक्री सुरू केली. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने कारवाई करून एका दारूविक्रेत्याचा मुद्देमाल जप्त केला हाेता. त्यानंतर, आता पुन्हा माेहझरी गाव परिसरात कारवाई करण्यात आली. नगरी परिसरातील अवैध व्यवसायावर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.
===Photopath===
120421\12gad_20_12042021_30.jpg
===Caption===
पाेलीस व मुक्तिपथ चमुने नष्ट केलेला माेहसडवा.