शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

२२० जणांची चिकित्सा

By admin | Updated: October 24, 2016 02:12 IST

पोलीस विभाग, सत्य सामाजिक संस्था देवरी व आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे

पोलीस विभागाचा पुढाकार : अहेरीत पोलीस जवान व कुटुंबीयांना लाभअहेरी : पोलीस विभाग, सत्य सामाजिक संस्था देवरी व आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबीयांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात एकूण २२० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. समाजात जातीय सलोखा व शांतता राहावी, याकरिता पोलीस जवान अहोरात्र कार्यरत असतात. धावपळीचे जीवन जगत असताना त्यांचे स्वत:च्या व कुटुंबीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलीस विभागाच्या वतीने अहेरी येथील पोलीस संकुलात महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २२० पोलीस जवान व त्यांचे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. या शिबिरात विविध आजारावर तज्ज्ञ चमूने मार्गदर्शन करून औषधोपचार केला. (तालुका प्रतिनिधी)विविध आजारांवर समुपदेशनशिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, हिवताप, रक्तगट तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षयरोग यासह अनेक आजारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संशयीत आढळलेल्या रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले. तसेच रूग्णांना औषधोपचार करण्यात आला. आजार दूर सारण्याकरिता नियमित औषधोपचार घेण्याचा सल्लाही वैैद्यकीय चमूकडून पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.