शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२१ ला गडचिरोलीत आदिवासी मेळावा

By admin | Updated: October 19, 2015 01:58 IST

जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर ...

पत्रकार परिषद : दोन दिवसीय मेळाव्यात विविध कार्यक्रमगडचिरोली : जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर २१ व २२ आॅक्टोबर रोजी आदिवासी देवतांची महापूजा व आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.क्रांतिवीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी मेळावा होणार आहे. बुधवारी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजतापर्यंत मैदानी क्रीडास्पर्धा घेण्यात येतील. त्यानंतर आधुनिक काळात ग्रामसभेचे महत्व व आदिवासी समाज या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. यानंतर आदिवासी मेळावा होईल. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. खा. अशोक नेते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या मेळाव्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गुरुवारी २२ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता पेसा कायदा- समज व गैरसमज आणि आरक्षणाची गरज या विषयावर परिसंवाद होईल. कवी प्रभू राजगडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील, दुपारी १२ वाजता आदिवासी देवतांची महापूजा व मार्गदर्शन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे हे राहतील. देवरीचे आ. संजय पुराम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात येईल. याप्रसंगी डॉ.नरेशचंद्र काठोडे हे स्पर्धा परिक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आ. डॉ. होळी व नरोटे यांनी दिली. यावेळी आविसंचे अ‍ॅड. मोहन पुराम, सुधाकर नाईक उपस्थित होते.