दारू, सुगंधित तंबाखूसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST2021-09-06T04:40:48+5:302021-09-06T04:40:48+5:30
आरमोरी तालुक्यातील किटाळी घाटावरून डोंग्याने हळदा येथे अवैध दारू व सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणाऱ्या दोघांना किटाळी गाव संघटनेच्या सदस्यांनी ...

दारू, सुगंधित तंबाखूसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त
आरमोरी तालुक्यातील किटाळी घाटावरून डोंग्याने हळदा येथे अवैध दारू व सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणाऱ्या दोघांना किटाळी गाव संघटनेच्या सदस्यांनी अडवले. यासंदर्भात मुक्तिपथ तालुका चमूला माहिती देण्यात आली. त्यानुसार आरमोरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी देऊळगाव येथील जितू सहारे याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा ६० पॉकिट ईगल सुगंधित तंबाखू व सूर्यडोंगरी येथील आशिष लालाजी मेश्राम यांच्याकडून ५ हजार रुपये किमतीची २० लिटर मोहफुलाची दारू असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल आरमोरी पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी दोन्ही अवैध व्यावसायिकांवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्या नेतृत्वात बिट अंमलदार कुळमेथे, कांबळे यांनी केली.