प्राणहिता नदीत नाव उलटली; तेलंगणातील दोन जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 14:30 IST2019-12-01T14:28:24+5:302019-12-01T14:30:11+5:30

अहेरीवरून तेलंगणातील गुडेमला नाव उलटली

2 missing after boat capsized in pranhita river in gadchiroli | प्राणहिता नदीत नाव उलटली; तेलंगणातील दोन जण बेपत्ता

प्राणहिता नदीत नाव उलटली; तेलंगणातील दोन जण बेपत्ता

अहेरी (गडचिरोली) : अहेरीजवळील प्राणहिता नदीमध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास नाव उलटली. प्राथमिक माहितीनुसार नावेत चार प्रवासी, एक नावाडी व त्याचा सहायक असे सहा जण होते. ही नाव अहेरीवरून तेलंगणातील गुडेम येथे जाण्यासाठी निघाली होती. प्राणहिता नदीत काही अंतर पार करताच नाव उलटली. त्यात नाव चालक, सहाय्यक व इतर दोन लोकांना पाण्यातून निघणे शक्य झाले. पण दोन जण अजूनही बेपत्ता आहे. 

नदीच्या तीव्र धारेत नाव सापडली. नावेत बसलेले चार जण तेलंगणा राज्यातील वन कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात मुंजम बालकृष्णा रा. कागजनगर व सुरेश बाणावत  रा. केरझारी  ता. अदिलाबाद हे दोघे तेलंगणाच्या करजेली रेंजचे  वनरक्षक आहे. ते वन कर्मचारी हेमलकसा फिरायला आले होते अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: 2 missing after boat capsized in pranhita river in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.