२ लाख ९२ हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:07 IST2019-02-09T01:06:53+5:302019-02-09T01:07:33+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ लाख ९२ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई आरमोरी परिसरातील रवी जंगल परिसरात ८ फेब्रुवारी रोजी २ वाजताच्या सुमारास केली.

2 lakh 92 thousand liquor seized | २ लाख ९२ हजारांची दारू जप्त

२ लाख ९२ हजारांची दारू जप्त

ठळक मुद्देरवी जंगलात कारवाई : चौघांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ लाख ९२ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई आरमोरी परिसरातील रवी जंगल परिसरात ८ फेब्रुवारी रोजी २ वाजताच्या सुमारास केली.
प्रविण टेंभुर्णे, राहूल टेंभुर्णे, प्रविण सोरते, अमित हेमके सर्व रा. आरमोरी या चौघांविरोधात आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राहूल टेंभुर्णे हा दारूची विक्री करीत असून त्याने दारूसाठा रवी जंगल परिसरात लपवून ठेवला आहे, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यावरून त्या परिसराचा शोध घेतला असता, त्यामध्ये दारू आढळून आली. सर्व दारू जप्त करून आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 2 lakh 92 thousand liquor seized