२ लाख ८५ हजारांचा माेहफूल सडवा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:23+5:302021-06-06T04:27:23+5:30
मुरुमबोडी व बोथेडा या दोन्ही गावांच्या मधोमध अवैध दारूविक्री केली जाते. या परिसरातील खुर्सा, गिलगाव, नवेगाव, अमिर्झा, धुंडेशिवणी, भिकारमौशी, ...

२ लाख ८५ हजारांचा माेहफूल सडवा केला नष्ट
मुरुमबोडी व बोथेडा या दोन्ही गावांच्या मधोमध अवैध दारूविक्री केली जाते. या परिसरातील खुर्सा, गिलगाव, नवेगाव, अमिर्झा, धुंडेशिवणी, भिकारमौशी, कळमटोला, आंबेशिवणी, आंबेटोला आदी गावांतील व्यसनी लोक दारू पिण्यासाठी येतात. मुरुमबोडी व बोथेडा या दोन्ही गावांत संध्याकाळ होताच मद्यपी दारू पिण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे परिसरातील शांतता व आरोग्य धोक्यात आले आहे. जंगल परिसरात दारू गाळली जात असल्याची माहिती गाव संघटनेच्या माध्यमातून प्राप्त होताच गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता, ३० क्विंटल मोहफुलाचा सडवा, २५ लिटर दारू व साहित्य आढळून आले. असा एकूण २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस हवालदार चंद्रकांत मडावी, आत्माराम गोनाळे, पोलीस शिपाई किशोर खोब्रागडे, महिला पोलीस उषा पुंगळा, मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
===Photopath===
050621\05gad_1_05062021_30.jpg
===Caption===
माेहफूल सडवा नष्ट करताना कर्मचारी.