भगवान महावीर स्वामी यांचा १७ ला जयंती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:30 IST2019-04-15T22:30:10+5:302019-04-15T22:30:27+5:30
जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

भगवान महावीर स्वामी यांचा १७ ला जयंती महोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली जाईल. बाजारपेठेतील साई मंदिर-गांधी चौक-राम मंदिर-विठ्ठल मंदिर-त्रिमूर्ती चौकातून शोभायात्रा निघणार आहे.
सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आरती व सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत बोदली येथील आश्रमशाळेत महाप्रसादाचे वितरण, तसेच दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत त्रिमूर्ती चौकातील नाट्यगृहातही महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.