शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये बिघाड आल्याने प्रवाशांची १५ किमी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

अहेरीवरून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी अहेरी-कांदोळी बस एटापल्लीवरून परत येत असताना सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आलापल्ली व तोंडेल फाट्याच्या ...

अहेरीवरून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी अहेरी-कांदोळी बस एटापल्लीवरून परत येत असताना सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आलापल्ली व तोंडेल फाट्याच्या मध्ये अचानक बंद पडली. यात आलापल्ली येथे ये-जा करणारे विद्यार्थी तथा नागपूरला जाणारे प्रवासी बसून होते. ही बस ९.१५ वाजता आलापल्लीवरून परत एटापल्लीकडे जात असते. त्यामुळे अनेक कर्मचारी याच बसने प्रवास करतात. मात्र बस आलापल्ली येथे न पोहोचल्याने विद्यार्थी आलापल्ली येथे शाळेच्या पहिल्या दिवशी वेळेवर पोहोचू शकले नाहीत.

९ वाजता बसमध्ये बिघाड आल्यानंतरही ११ वाजतापर्यंत अहेरी आगारातून दुरुस्ती पथक बस दुरुस्तीसाठी आले नाही. त्यामुळे प्रवासी तथा विद्यार्थी जंगलात ताटकळत होते. बसमधील बिघाडामुळे कांदोळी फेरी रद्द करण्यात आल्याने एटापल्ली येथे कामानिमित्त आलेले नागरिक बुर्गी, कांदोळी येथे १५ किमीचे अंतर पायी कापून गावाला परत गेले. अहेरी आगाराच्या बहुतांश बसेस भंगार झाल्या आहेत. ग्रामीण भागात चालणाऱ्या बसेस या नेहमीच रस्त्यात बिघाड येऊन जंगलात उभ्या कराव्या लागतात. आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी तथा विद्यार्थ्यांनी केली आहे.

बाॅक्स

डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक बसफेऱ्या उशिरा

अहेरी आगारात मागील ४ ते ५ दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे. एटापल्ली मार्गावरच डिझेल संपल्याने एक बस जंगलात उभी करावी लागली. तसेच मंगळवारी सकाळपासून अनेक बसफेऱ्या सोडण्यात आल्या नाही तर काही फेऱ्या दुपारी सोडण्यात आल्या. अहेरी आगारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात डिझेल प्राप्त हाेत असल्याने अनेक बसफेऱ्या रद्द हाेत आहेत.