१४४ दंडाधिकाऱ्यांची मुदत आॅगस्टमध्ये संपणार
By Admin | Updated: June 25, 2014 23:44 IST2014-06-25T23:44:57+5:302014-06-25T23:44:57+5:30
१८ आॅगस्ट २००९ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात नियुक्त झालेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची मुदत १८ आॅगस्ट २०१४ ला संपणार आहे. त्यामुळे १४४ जणांचे दंडाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात येतील.

१४४ दंडाधिकाऱ्यांची मुदत आॅगस्टमध्ये संपणार
गडचिरोली : १८ आॅगस्ट २००९ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात नियुक्त झालेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची मुदत १८ आॅगस्ट २०१४ ला संपणार आहे. त्यामुळे १४४ जणांचे दंडाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात येतील.
१८ आॅगस्ट २००९ ला राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये १४४ जणांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून निवड केली होती. यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १८ आॅगस्ट २०१४ ला पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहे. २००९ मध्ये गडचिरोली तालुक्यात ३१, चामोर्शी तालुक्यात २०, धानोरा तालुक्यात ८, मुलचेरा तालुक्यात १४, देसाईगंज तालुक्यात ८, कुरखेडा तालुक्यात २१, कोरची तालुक्यात ७, अहेरी तालुक्यात ८, सिरोंचा तालुक्यात १७, एटापल्ली तालुक्यात ४, भामरागड तालुक्यात ६ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ३१ आॅक्टोबर २०११ ला पुन्हा राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवणी यादी काढून १०२ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले व २० जानेवारी २०१२ ला पुन्हा पुरवणी यादी प्रकाशित करून ४६९ जणांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी गडचिरोली जिल्ह्यात वर्णी लावण्यात आली होती. यांची मुदत अनुक्रमे ३१ आॅक्टोबर २०१६ व २० जानेवारी २०१७ रोजी संपणार आहे. सध्या तरी यंदा आॅगस्टमध्ये १४४ विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात अनेक पत्रकारांचाही समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)