शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांचा सिंचन प्रश्न सुटणार

By admin | Updated: September 24, 2014 23:34 IST

रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता.

गावकऱ्यांनी दिली चावी परत : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे आश्वासनघोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त १४ गावातील नागरिकांनी मंगळवारी दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. यासंदर्भात बुधवारी चापलवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात सभा झाली. या सभेत १४ गावाच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी दिना कालव्याच्या कुलूपाची चावी अभियंत्याकडे सोपविली.बुधवारी चापलवाडा येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीला पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन विभाग चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता बारापात्रे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी १४ गावातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. जि. प. सदस्य सोनटक्के यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून १४ गावाच्या शेतीला दिना प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पोहोचते किंवा नाही, याची शहानिशा करण्याची मागणी केली. यावर यासंदर्भात सर्व्हेक्षण करून याबाबतची माहिती १४ गावातील शेतकऱ्यांना देण्याची कबुली अभियंता सिंचाई उपविभाग चामोर्शी यांनी स्वीकारली. तसेच सर्व्हेक्षण पूर्ण करून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.सर्व्हेक्षणाअंती दिना प्रकल्पाचे पाणी १४ गावाच्या शेतीला खरीप हंगामाला देण्याचे मान्य करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अभियंता बांदे उपस्थित होते. तसेच सुरेश मोहुर्ले, गिरमा मोहंदा, रेवनाथ ठाकूर, गोपिनाथ बांकवार, गुरूदास पालकवार, सुधाकर मेकलवार, वसंत आत्राम, विलास ठाकूर, नानाजी पदा, केशव खोब्रागडे, नितेश कोहपरे, विलास चौधरी, चैतू हिचामी, काशिनाथ वैरागडे, विजय वाकडे, संजय वाकडे, केशव पोटावी आदी १४ गावातील शेतकरी उपस्थित होते. यापूर्वीही दोन ते तिनदा १४ गावातील शेतकऱ्यांनी आलटून पालटून दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. (वार्ताहर)