शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

१३६ वाहनधारकांना नोटीस

By admin | Updated: November 15, 2014 01:37 IST

३१ मार्च २०१४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्व प्रकारची मिळून एकूण ८३ हजार ५२२ चारचाकी व दुचाकी वाहने आहेत.

दिलीप दहेलकर गडचिरोली३१ मार्च २०१४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्व प्रकारची मिळून एकूण ८३ हजार ५२२ चारचाकी व दुचाकी वाहने आहेत. यापैकी सध्य:स्थितीत ४० टक्के वाहनांची परवाना तसेच योग्यता प्रमाणपत्र वैधता संपुष्टात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. विशेष म्हणजे परिवहन विभागाच्यावतीने परवाना व योग्यता प्रमाणपत्र वैधतेची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १३६ वाहनधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून परवाना व नुतनीकरणासाठी परिवहन कार्यालयात वाहनधारकांची सध्या गर्दी होत आहे. योग्यता प्रमाणपत्र वैध असल्याशिवाय कोणत्याही वाहनचालकाने आपले वाहन रस्त्यावर चालवू नये, ज्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आहे, अशी वाहने वाहतुकीत आढळून आल्यास वाहनांना दंड आकारणी करण्यात येईल, असा फतवा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे. सदर नियम दुचाकी वाहनाला नसून केवळ परिवहन वाहनांसाठी आहे. परिवहन वाहनांमध्ये आॅटो रिक्षा, टॅक्सी, तीनचाकी मालवाहक वाहन, स्कूल बस, खासगी सेवेतील वाहन, रूग्णवाहिका, नॉन कृषक ट्रेलर आदींचा समावेश आहे. योग्यता प्रमाणपत्र वैधता संपुष्टात आलेल्या वाहनधारकांना परवाना व योग्यता प्रमाणपत्राचे त्वरित नुतनीकरण करून घ्यावे, तपासणी मोहिमेमध्ये ज्या वाहनाकडे परवाना व योग्यता प्रमाणपत्र वैध नसल्यास अशा वाहनांना रस्त्यावर चालण्यापासून मज्जाव करण्यात आला असून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आला आहे. वैधता मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी प्रतिदिवस १०० रूपये आकारण्यात येणार आहे. १० दिवसाकरिता १ हजार रूपये व ३० दिवसांकरिता कमाल ३ हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या ट्रक, टॅम्पो, लहान एलएमबी, रिक्षा, टॅक्सी व बसेस आदी वाहनांद्वारे वाहतुकीदरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते, कारण अशा वाहनांचा फिटनेस बिघडलेला असतो. त्यामुळे अशी वाहने वाहतुकीवर अधिक धोकादायक असतात. अपघाताचे प्रमाण वाढू नये, या उद्देशाने परिवहन विभागाने परवाना व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे सक्त निर्देश दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.