जिल्हास्तरावरील १३ डॉक्टर देताहेत कोरोनाविरूध्द लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:36+5:30

दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सर्वांना त्रस्त करून सोडलेल्या कोरोना या आजाराच्या विरोधात लढताना वैद्यकीय यंत्रणेचा ...

13 doctors at district level are fighting against corona | जिल्हास्तरावरील १३ डॉक्टर देताहेत कोरोनाविरूध्द लढा

जिल्हास्तरावरील १३ डॉक्टर देताहेत कोरोनाविरूध्द लढा

ठळक मुद्दे२४ तास ड्युटी : जिल्हा रुग्णालयातून १२३ जण कोरोनामुक्त




दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वांना त्रस्त करून सोडलेल्या कोरोना या आजाराच्या विरोधात लढताना वैद्यकीय यंत्रणेचा कस लागत आहे. इतर सामान्य लोकांना कोरोना रुग्णाच्या जवळही जाता येत नसताना अनेक तास रुग्णांच्या सानिध्यात राहणाऱ्या डॉक्टरांना मात्र अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या वॉर्डात जवळपास १३ डॉक्टर ड्युटीवर आहेत. रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेऊन आतापर्यंत १२३ रुग्ण बरे झाले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरूद्ध लढा देणाºया या १३ डॉक्टरांची सेवा इतर डॉक्टरांसाठी प्रेरणादायी अशी ठरणारी आहे.
सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा आजार, दम लागणे, चव जाणे, नाकाला वास न येणे, अंगदुखी ही कोरोना आजाराची लक्षणे आहेत. कोरोना संशयित व पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व रुग्णांना आधी जिल्हा रुग्णालयातच भरती केले जात होते. पण रुग्ण वाढल्यामुळे आता तालुकास्तरावरही उपचार सुरू केले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, बाह्यरुग्ण विभागाचे निवासी अधिकारी डॉ.बागराज धुर्वे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांवर आतापर्यंत यशस्वीपणे उपचार झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे ७ आयसोलेशन वॉर्ड आहेत. एका वॉर्डात जवळपास २० ते २२ रुग्ण दाखल असतात. सर्व वॉर्ड मिळून १५० च्या आसपास रुग्णांवर येथे औषधोपचार केला जात आहे. फिजिशियन तज्ज्ञ डॉ.प्रशांत कारेकर, डॉ.मनीष मेश्राम, डॉ.सचिन कवाडकर, डॉ.ओमप्रकाश ढोंगे, डॉ.राज देवकुले हे आयसोलेशन वॉर्डात प्रत्यक्ष २४ तास ड्यूटी करून बाधितांवर औषधोपचार करीत आहेत. या डॉक्टरांच्या सोबतीला नर्स, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आदी कर्मचारी कोरोनामुक्तीच्या लढ्यात अग्रेसर आहेत.
कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना वॉर्डात शिफ्ट करण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशनी किरंगे, डॉ.तुषार धुर्वे, डॉ.श्रद्धा काळे, डॉ.पवन कोकोरे, डॉ.पराग चोले, डॉ.तेजस्वीनी मांडरे, डॉ.सुरपाम, डॉ.चव्हाण आदी आठ डॉक्टर करीत आहेत.

अहवाल निगेटीव्ह आल्याशिवाय सुटी नाही
आयसोलेशन वॉर्डात २४ तास ड्युटी करून रुग्णांवर प्रत्यक्ष औषधोपचार करणाºया डॉक्टरांना घर व आपल्या कुटुंबापासून सात दिवस दूर राहावे लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पाच फिजिशियन डॉक्टरांची सात दिवस २४ तास ड्युटी असते तर उर्वरित आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ तास ड्युटी असते. फिजिशियन डॉक्टरांना त्याच ठिकाणी मुक्कामी राहून कर्तव्य बजावावे लागते. सात दिवसांची ड्युटी संपल्यानंतर त्यांचे आठव्या दिवशी सकाळी कोरोनाबाबत नमुने घेतले जातात. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर संबंधित डॉक्टरांची ड्युटीतून मुक्तता केली जाते. त्यानंतर दुसºया डॉक्टरला सात दिवसाकरिता जिल्हा रुग्णालयात मुक्कामी राहून ड्युटी करावी लागते.

Web Title: 13 doctors at district level are fighting against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.