शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोंतर्गत १२३ बांध्यांची निर्मिती

By admin | Updated: June 29, 2015 02:03 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत मागील तीन वर्षात सुमारे १२३ धानाच्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

धानाचे उत्पादन : हजारो नागरिकांना मिळाला रोजगारगडचिरोली : रोजगार हमी योजनेंतर्गत मागील तीन वर्षात सुमारे १२३ धानाच्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. धान पिकाला सिंचनाची गरज भासत असल्याने पाणी टिकून राहावे, यासाठी बांध्या निर्माण केल्या जातात. मात्र यासाठी हजारो रूपयांचा खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत राहत असल्याने सदर शेतकरी बांध्यांची निर्मिती करू शकत नाही. परिणामी शेतजमीन पडीक ठेवण्याची पाळी येते. अशा गरीब शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत धानाच्या बांध्यांची निर्मिती करून दिली जाते. २०११-१२ या आर्थिक वर्षात ८५ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी एक कोटी दोन लाख रूपये एवढा खर्च आला. २०१२-१३ या वर्षात १५ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्याला २७ लाख ४२ हजार रूपये खर्च आला. सन २०१३-१४ मध्ये २३ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी २३ लाख रूपयांचा खर्च आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षात १३५ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)