१२०० उमेदवार देणार लेखी परीक्षा

By Admin | Updated: June 21, 2014 01:35 IST2014-06-21T01:35:39+5:302014-06-21T01:35:39+5:30

पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी सकाळी घेण्यात येणार आहे.

1200 candidates will be given written test | १२०० उमेदवार देणार लेखी परीक्षा

१२०० उमेदवार देणार लेखी परीक्षा

गडचिरोली : पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी सकाळी घेण्यात येणार आहे. जवळपास १ हजार २०० उमेदवार ही परीक्षा देणार असून दुसऱ्या गावचे व जिल्ह्यातील युवकांचे जत्थे शहरात शुक्रवारी सायंकाळीच दाखल झाले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने ८३ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी सुमारे ७ हजार ९१२ युवकांनी अर्ज केले होते. सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेतल्यानंतर १ हजार २०० उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांची परीक्षा शनिवारी सकाळी पोलीस मैदानावर घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांना सकाळी ६ वाजेपासूनच बोलविण्यात आले आहे. बहुतांश युवक दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यातीलही युवकांना सकाळी ६ वाजता गडचिरोली येथे येणे शक्य होत नाही. त्यामुळे बरचसे युवक शुक्रवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले. काही युवक रात्रभर शहरातील लॉजमध्ये थांबले आहेत. मात्र बऱ्याचशा युवकांना लॉजचे पैसे देणे परवडणारे नसल्याने हे युवक जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कसेतरी रात्र काढणार आहेत. लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी यांचे एकत्र गुण मिळवून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षेलाही अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 1200 candidates will be given written test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.