दहावी हॉलतिकीट आता ऑनलाइन ; परीक्षेच्या तारखा झाल्या जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:33 IST2025-01-23T15:31:20+5:302025-01-23T15:33:42+5:30

विद्यार्थ्यांसाठी सुविधा : २० जानेवारीपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध

10th hall ticket now online; exam dates announced | दहावी हॉलतिकीट आता ऑनलाइन ; परीक्षेच्या तारखा झाल्या जाहीर

10th hall ticket now online; exam dates announced

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्नित सर्व माध्यमिक शाळांना दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून दिली जात आहेत. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या २० जानेवारीपासून उपलब्ध होत आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारीपासून उपलब्ध होत आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवारी, दि. २० जानेवारीपासून अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उ‌द्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


उशिरा आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही एक्स्ट्रा सीट नंबर अॅडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या मुलांचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर त्या शाळांनी प्रवेश पत्राची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ड्युप्लिकेट प्रवेशपत्र असा शेरा देऊन ते द्यावे लागणार आहे. 


डाऊनलोडसाठी शुल्क न घेण्याच्या सूचना

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होत आहेत. शाळेला हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. 
  • यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉल तिकीटसाठी कोणत्याही शाळेने पैसे घेतल्यास तक्रार करावी.


मुख्याध्यापकांचा शिक्का घ्यावा लागणार 
प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंटिंग करून त्यावर मुख्याध्यापकांनी त्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करून ते मुलांना द्यावे लागणार आहेत. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस आहे त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस अॅडमिट कार्ड या पर्यायद्वारे उपलब्ध होणार आहेत.


बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून 
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० जानेवारीपासून मुलांना देण्यात येत आहे. बारावीची प्रवेशपत्रं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अॅडमिट कार्ड या लिंकवरून डाऊनलोड करता येणार आहे.


२० जानेवारीपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध
मुलांना शाळांकडून ऑनलाइन हॉल तिकीट २० जानेवारीपासून मिळत आहे. शाळांमार्फतीने ऑनलाइन हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढली जात आहे. शिक्का मारून ते दिले जात आहे.


"दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट शाळास्तरावरून ऑनलाइन स्वरूपात प्रिंट काढून मिळणार आहेत." 
- वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, गडचिरोली.

Web Title: 10th hall ticket now online; exam dates announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.