शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

१० यंत्र करणार भामरागडात रोवणी

By admin | Updated: July 27, 2014 23:45 IST

भामरागड तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी गटांना १० रोवणी यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भामरागड तालुक्यातील

दुर्गम गावात वितरण : आदिवासी शेतकऱ्यांना दिली यांत्रिकी शेतीची माहितीभामरागड : भामरागड तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी गटांना १० रोवणी यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीकडे वळविण्याचे प्रयत्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांच्या गटाला धान रोवणी यंत्र पुरविण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्याअंतर्गत जुवी येथील शेतकरी मंडळास प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांच्या हस्ते यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, आदिवासी विकास निरीक्षक टांगसेलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी चुक्कू चिन्ना पुंगाटी यांच्या शेतामध्ये यंत्राद्वारे भात रोवणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जुवी येथील १० शेतकरी गटांना कृषी विभागाच्या सहाय्याने बियाणे व रोप तयार करण्यास प्लॅस्टिकचा पुरवठा करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनकवडे म्हणाले, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. या उलट यंत्राच्या साहाय्याने धान रोवणी केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वेळेची बचत होईल. तसेच यांत्रिकी पद्धतीच्या शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळून शेतकऱ्यांची प्रगती होईल, असेही सोनकवडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यांत्रिकी पद्धतीने शेती करण्यासाठी रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावी, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोत्तावार, तलमले, कापगते, मंगरू कुडयामी, लालसु नगोटी, रायधर बाकडा यांनी सहकार्य केले. यावेळी जुवी परिसरातील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)