सुंदरनगर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावामध्ये लसीकरण करण्यात आले. मुलचेरा तालुक्यातील पुल्लीगुड्डम, बाेलेपल्ली, काेपरअल्ली, भवानीपूर येथे नागरिकांचे तसेच पाेलीस ठाण्यामध्ये जवानांना लसीकरण करण्यात आले. आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नंदकुमार माळाकाेळीकर यांनी बीडीओ युवराज लाकडे, जि. प. सदस्य रवींद्र शहा, उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार कपील हालदार, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. जावेद यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या मदतीने गावामध्ये माेठ्या प्रमाणात काेविड लसीकरण करून घेतले.
लसीकरण माेहिमेसाठी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. शशिकांत शंभरकर, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी डाॅ. समीर बन्साेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
बाॅक्स ......
लसीकरण वाढवा, सुविधा देऊ
जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आराेग्य केंद्रांमधील गावांमध्ये काेविड लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे अशा प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये आरओ केंद्रामार्फत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटले आहे. मुलचेरा तालुक्याप्रमाणे इतर तालुक्यांनीसुद्धा लसीकरण माेठ्या प्रमाणात करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.