१ लाख ९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:38 IST2025-03-11T17:36:58+5:302025-03-11T17:38:27+5:30
समग्र शिक्षा अभियानअंतर्गत लाभ : शिक्षण विभागाचे नियोजन पूर्ण

1 lakh 9 thousand students will get free textbooks
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ९ हजार ७९२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी इयत्ता १ली ते ८वीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती मोफत पुस्तके मिळावीत, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी शाळेतच मिळणार हातात पुस्तके
येत्या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना नंतरच्या दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत.
यंदा वाढीव नियोजन
जिल्ह्यातील ग्रामीण शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढवून त्यानुसार मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वाटपावेळी संख्या कमी-जास्त होऊ शकते
कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थ्यांना होणार वाटप?
तालुका विद्यार्थी
गडचिरोली १३७७८
आरमोरी ९६२४
चामोर्शी १७८८०
कुरखेडा ८७६२
धानोरा ९९६४
अहेरी १३११९
एटापल्ली २६७६
सिरोंचा ६०७०
देसाईगंज ७८९८
कोरची ५१५७
मुलचेरा ५२७४
भामरागड ३५९०
"इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्या अनुषंगाने योग्य नियोजन करण्यात येत आहे."
- विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)