शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

UEFA Champions League: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाणं एकदम खणखणीत; विश्वविक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:57 AM

UEFA Champions League :युव्हेन्टस क्लबने बुधवारी 1-0 अशा फरकाने व्हॅलेन्सिया क्लबवर मात करून चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या बाद फेरीत एटित प्रवेश केला.

ठळक मुद्देख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमाला गवसणीचॅम्पियन्स लीगमध्ये शंभर सामने जिंकणारा पहिलाच खेळाडू युव्हेन्टस क्लबचा बाद फेरीत प्रवेश

माद्रिद, चॅम्पियन्स लीग फुटबॉल: युव्हेन्टस क्लबने बुधवारी 1-0 अशा फरकाने व्हॅलेन्सिया क्लबवर मात करून चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या बाद फेरीत ऐटीत प्रवेश केला. या सामन्यात क्रोएशियाच्या मारियो मॅनझुकिचने गोल केला. पण, नेहमीप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डो भाव खावून गेला. मॅनझुकिचच्या या विजयी गोलमध्ये रोनाल्डोची सिंहाचा वाटा आहे. त्याने व्हॅलेन्सियाच्या खेळाडूंना चकवून मॅनझुकिचला गोल करण्याची सोपी संधी निर्माण करून दिली. या कौशल्याबरोबरच रोनाल्डो आणखी एका कारणाने चर्चेत राहिला आणि ते म्हणजे त्याने केलेल्या विश्वविक्रमाने. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात विजयाचे शतक साजरे करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला. मॅनझुकिचने चॅम्पियन्स लीगमधील तिसऱ्या गोलची नोंद केली. यंदाच्या हंगामातील हा त्याचा पहिलाच गोल ठरला. याआधी त्याने गतहंगामात उपांत्यपूर्व फेरीत रेयाल माद्रिदविरुद्ध दोन गोल केले होते. इटालियन चॅम्पियन युव्हेन्टसला पहिल्या सत्राव गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पाऊलो डिबाला, मॅनझुकिच आणि रोनाल्डो या तगड्या आक्रमणपटूंना स्पॅनिश क्लबची बचावभींत भेदताना अपयश येत होते. मात्र त्यांनी दुसऱ्या सत्रात खेळ सुधारला आणि एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. व्हॅलेन्सियाने कमबॅक करण्याची संधी गमावली. या विजयाबरोबर युव्हेन्टसने चॅम्पियन्स लीगच्या साखळी फेरीत सलग सहाव्या विजयाची नोंद केली. याशिवाय त्यांनी प्रथमच सलग पाचव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. पण, या पलीकडे रोनाल्डोने कोणालाही न जमलेला विक्रम नावावर केला. त्याच्यासाठी हा चॅम्पियन्स लीगमधील शंभरावा विजय ठरला. चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर विजय नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने मँचेस्टर युनायटेड व रेयाल माद्रिदकडून अनुक्रमे 26 व 71 विजय मिळवले आहेत, तर युव्हेन्टसकडू हा त्याचा तिसराच विजय ठरला.ऑक्टोबर 2003 मध्ये त्याने मॅंचेस्टर युनायटेडकडून चॅम्पियन्स लीगमध्ये पदार्पण केले होते. स्टुट्गार्टविरुद्धच्या त्या सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र पुढच्याच सामन्यात रेंजर्स क्लबला पराभूत करून त्याने पहिल्या विजयाची चव चाखली. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक 121 गोल्सचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

टॅग्स :UEFA Champions Leagueचॅम्पियन्स लीग फुटबॉलCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो