UEFA Champions League : अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 15:44 IST2018-09-20T15:43:09+5:302018-09-20T15:44:01+5:30

UEFA Champions League: युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली.

UEFA Champions League: Cristiano Ronaldo cried after gets first red card | UEFA Champions League : अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडला

UEFA Champions League : अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडला

मेस्टॅल्ला : युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली. त्यामुळे रोनाल्डो ढसाढसा रडला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत युव्हेंटसकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोनाल्डोला व्हॅलेंसिया क्लबविरुद्धच्या लढतीत 29 व्या मिनिटाला पंचांनी थेट लाल कार्ड दाखवले. त्यामुळे मैदान सोडताना रोनाल्डोचा अश्रुंचा बांध फुटला होता.
चॅम्पियन्स लीगमधील 'H' गटातील या लढतीत युव्हेंटसने 2-0 असा विजय मिळवला. मिरालेम पीजॅनिचने ( 45 व 51 मि.) पेनल्टी स्पॉट किकवर केलेले गोल युव्हेंटसच्या विजयासाठी पुरेसे ठरले. मात्र, हा सामना लक्षात राहील तो रोनाल्डोला मिळालेल्या रेड कार्डमुळे. 



चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात रोनाल्डोला 154 सामन्यांत मिळालेले हे पहिलेच रेड कार्ड ठरले. रेफरीच्या रेड कार्डच्या निर्णयावर रोनाल्डोच्या चाहत्यांनी तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. 







Web Title: UEFA Champions League: Cristiano Ronaldo cried after gets first red card