शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

'या' चिमुरड्याचं फुटबॉल कौशल्य पाहून अवाक् व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 3:51 PM

जगातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं.

मुंबईः ब्राझील, अर्जेंटिना, इटली, जर्मनी, पोर्तुगाल या देशांमध्ये फुटबॉल हा जणू धर्मच आहे. तिथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तातच फुटबॉलवेड असतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच, हे देश गेली अनेक वर्षं फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवताहेत. एक खेळाडू निवृत्त व्हायची खोटी; त्यांच्याकडे दुसरा - त्याच्यापेक्षा जबरा खेळाडू तयारच असतो. पेले, मॅरेडोना यांचा वारसा रोनाल्डो, रोनाल्डिनो, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी, डी मारिया, बेन्झिमा, लुइस सुवारेझ हे शिलेदार पुढे नेत आहेत. त्यांचा खेळ बघताना कट्टर फुटबॉलप्रेमींची पापणीही लवत नाही. चपळता, चलाखी, पदलालित्य, पासिंग, हेडर, कॉर्नर, किक या सगळ्यातच हे लोक 'बाप' आहेत. पण हे कौशल्य अंगी बाणवण्यासाठी त्यांनी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीपासून जिद्दीनं, चिकाटीनं परिश्रम केलेले असतात. 

या स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचा मेसेजही फिरतोय, पण त्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. पण, 'मेकिंग ऑफ स्टार फुटबॉलर' म्हणून या व्हिडिओकडे नक्की बघता येईल.

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाLionel Messiलिओनेल मेस्सी