रोनाल्डोच्या 'या' फोटोने रचला इतिहास, जगातून झाला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:00 IST2018-07-23T12:57:34+5:302018-07-23T13:00:42+5:30

 रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता.

Ronaldo's 'This' photo has been created history | रोनाल्डोच्या 'या' फोटोने रचला इतिहास, जगातून झाला कौतुकाचा वर्षाव

रोनाल्डोच्या 'या' फोटोने रचला इतिहास, जगातून झाला कौतुकाचा वर्षाव

मुंबई -  रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता. रेयाल माद्रिदसह त्याने घालवलेले प्रत्येक क्षण अविस्मरणीय होते. त्याने रेयालकडून 450हून अधिक गोल केले, तर चार वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावला. तरीही त्याने इटालियन क्लबसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चाहत्यांना पचवणे अवघड गेले, परंतु त्यांनी त्याचा आता स्वीकारही केला. रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबची जर्सी घालून इंस्टाग्रामवर टाकलेला फोटो हा एखाद्या खेळाडूचा जगात सर्वाधिक लाइक्स मिळाळेला फोटो ठरला. अन्य सेलेब्रिटींमध्ये या फोटोने अमेरिकन अभिनेत्री केली जेनर आणि पॉप सिंगर जस्टीन बिबर यांच्या पाठोपाठ चौथे स्थान पटकावले आहे. 
रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबची जर्सी घातलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्याला सर्वाधिक 11.9 कोटी लाइक्स मिळाले.  


यासह त्याने स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम मोडला. त्याने नोव्हेंबर महिन्यात चौथ्या मुलाच्या जन्माची घोषणा करतानाच्या पोस्टला 11.4 कोटी लाइक्स मिळाले होते. 

सेलेब्रिटींमध्ये सर्वाधिक लाइक्स मिळण्याच्या क्रमवारीत बिबर तिस-या स्थानावर आहे. त्याने हेली बॅल्डवीनसह विवाह करत असल्याच्या पोस्टला 12.7 कोटी लाइक्स मिळाले होते. या क्रमवारीत जेनरने पहिले व दुसरे स्थान पटकावले आहे. 

Web Title: Ronaldo's 'This' photo has been created history