शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

फक्त दोन कसोटी सामने खेळलेला फिरकीपटू होणार मुंबईचा प्रशिक्षक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 3:11 PM

रणजी करंडकाची सर्वाधिक 41 जेतेपदे नावावर असलेल्या मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध जोरात सुरू आहे. 2017-18च्या हंगामात मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. माजी खेळाडू समीर दिघे यांनी काही कारणास्तव प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवारच्या नावाची चर्चा आहे. 

मुंबई -  रणजी करंडकाची सर्वाधिक 41 जेतेपदे नावावर असलेल्या मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध जोरात सुरू आहे. 2017-18च्या हंगामात मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. माजी खेळाडू समीर दिघे यांनी काही कारणास्तव प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवारच्या नावाची चर्चा आहे. मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी पोवारसह विनायक सामंत आणि प्रदीप सुंदराम यांचे अर्ज आले होते. या तीन माजी खेळाडूंमध्ये 2 कसोटी आणि 31 वन डे सामने खेळणा-या पोवारचे पारडे जड मानले जात आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा याला प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले नाही. रात्रा मागील हंगामात पंजाबच्या संघासह होते. त्यांनीही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार प्रशिक्षक हा मुंबईचाच असायला हवा. रात्राने हरयाणाकडून स्थानिक सामने खेळला आहे. मुंबईच्या प्रशिक्षकासाठी एमसीएकडे अधिक पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अर्ज आलेल्यांपैकी एका नावाची लवकरच घोषणा करण्यात येईल. समीर दिघे यांनी 2017-18 च्या हंगामात ही जबाबदारी सांभाळली होती. चंद्रकांत पंडित यांच्या जागी दिघेला संधी मिळाली होती. मात्र, एमसाएचा हा निर्णय चुकीचा ठरला. मुंबईला रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही संघाला हार मानावी लागली होती. 6 कसोटी आणि 23 वन डे सामने खेळणा-या दिघेंनी गत महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकMumbaiमुंबईCricketक्रिकेटSportsक्रीडा