Neymar's name mistakenly appears in $120 coronavirus welfare payment scheme in Brazil | कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य

कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 67 लाख 14,335 इतकी झाली आहे. त्यापैकी 32 लाख, 61,276 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 93,408 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा लोकांसाठी ब्राझील सरकारने 9 हजारांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्यासाठी जगातील श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या नेयमारनं अर्ज केल्याचा प्रकार घडला आहे. हे खरं आहे का?

जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये ब्राझिलचा स्टार खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर येतो. गतवर्षी त्यानं 721 कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे. पॅरिस सेंट जर्मेन क्लबनं त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 222 मिलियन युरो मोजले आहेत. लॉकडाऊनच्या काळात इंस्टाग्रामवर 4 पोस्ट करून त्यानं 11.4 कोटी रुपये कमावले. तरीही नेयमारनं खरंच सरकारच्या 9 हजारांच्या मदतीसाठी अर्ज केला ?

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझिलमध्ये सापडले आहेत. ब्राझिलमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 6 लाख 15,870 इतकी झाली आहे. त्यापैकी 34,039 रुग्ण दगावले असून 2 लाख 74,997 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे तेथील लॉकडाऊन वाढवला आला आहे. या काळात गरीबांसाठी सरकरानं 120 डॉलरचे म्हणजेच 9 हजारांचे अर्थसहाय्य जाहीर केले. त्यासाठी अर्ज केलेल्या नावांमध्ये नेयमारचेही नाव आढळल्यानं एकच खळबळ उडाली.

नेयमारच्या ओळखपत्र क्रमांकावरून हा अर्ज केला गेला होता. पण, त्याचे ओळखपत्र चोरून अर्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. ही मदत तेथील सफाई कामगार व घरकाम करणाऱ्यांना दिली जातआहे. लॉकडाऊनमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे नेयमार या अर्जासाठी पात्र ठरत नाही. ''नेमयारच्या नावाचा अर्ज आला होता आणि त्याला योजनेचे पैसेही मंजूर झाले होते. पण, मुल्यांकनांतर्गत ते पैसे त्याच्या खात्यात जमा झाले नाही,''असे एका अधिकाऱ्यानं सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!

Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!

वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान! 

 चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!

 

Read in English

Web Title: Neymar's name mistakenly appears in $120 coronavirus welfare payment scheme in Brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.