आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभरात आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये सध्याच्या घडीला तो आघाडीवर आहे. त्यामुळेच त्याच्या मागे स्पॉन्सरची, जाहीरातदारांची भलीमोठी रांग लागलेली पाहायला मिळते.

लोकप्रियतेच्या बाबतीत कोहली जगभरातील सेलिब्रेटिंनाही मागे टाकत आहे. त्यामुळे इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावरही तो बक्कळ कमाई करत आहे.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटनं मानाचं स्थान पटकावलं आहे. पण, भारताच्या या स्टार खेळाडूवर अमेरिकेच्या हॉट मॉडल भारी पडल्या आहेत.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटिंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोनं अव्वल स्थान कायम राखले आहे.

मागील 12 महिन्यांत 43 स्पॉन्सर्सकडून रोनाल्डोनं इंस्टाग्रामवर 396 कोटी 47,41,341 इतके कमावतो.

युव्हेटस क्लबकडून मिळणाऱ्या 259 कोटींच्या तुलनेत रोनाल्डो इंस्टाग्रामवर अधिक कमावतो. रोनाल्डो एका पोस्टमागे 9 कोटी 23,28,797 इतके कमावतो. 2019च्या तुलनेत रोनाल्डोच्या कमाईत 3.5 मिलियन पाऊंड वाढ झाली आहे.

रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचा स्टार लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इंस्टाग्रावरील मेस्सीची वर्षभराची कमाई ही 239 कोटी 56,06,169 इतकी आहे, तर एका पोस्टमागे त्याला जवळपास सहा कोटी मिळतात.

अमेरिकन मॉडल केंडल जेन्नर या क्रमांकात तिसऱ्या स्थानावर आहे. 2020 साली इंस्टाग्रावर सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला सेलिब्रेटींमध्ये केंडल अव्वल स्थानी आहे.

इंस्टाग्रावर तिची वर्षभराची कमाई ही 201 कोटी 69,21,602 इतकी आहे. एका पोस्ट मागे ती 5 कोटी 32,56,918 कमावते.

चौथ्या क्रमांकावर अमेरिकन मॉडल कायली जेन्नर आहे.

ती वर्षाला 154 कोटी 11,41,964 इतके कमावते आणि एका पोस्ट मागे तिला 11 कोटी 41,32,339 कमावते.

भारताचा स्टार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. तो वर्षाला 123 कोटी 61,06,601 इतके कमावतो.

एका पोस्टमागे तो 2 कोटी 20,59,748 इतके कमावतो.

Read in English