मेस्सीचे अनुकरण करताना गमावला जीव, मैदानावरच कोसळला युवा खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 03:29 IST2018-07-07T03:29:31+5:302018-07-07T03:29:45+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. भारतही याला अपवाद नाही. तरुण पिढीचा फुटबॉलकडे अधिक ओढा आहे. देशातील फुटबॉलचाहत्यांमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंची क्रेझ आहे, स्थानिक युवा आपल्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करतात.

मेस्सीचे अनुकरण करताना गमावला जीव, मैदानावरच कोसळला युवा खेळाडू
कोलकाता : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. भारतही याला अपवाद नाही. तरुण पिढीचा फुटबॉलकडे अधिक ओढा आहे. देशातील फुटबॉलचाहत्यांमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंची क्रेझ आहे, स्थानिक युवा आपल्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करतात. असेच मेस्सीचे अनुकरण करणे कोलकातातील एका तरुणाला महागात पडले.
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक फुटबॉल स्पर्धेत ही घटना घडली. २० वर्षांचा सागर लियोनेल मेस्सीचा फॅन होता. मंगळवारी सामन्यादरम्यान सागरने मेस्सीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मेस्सीसारखी हवेत किक मारण्याचा त्याचा प्रयत्न होताच. पण हा स्टंट अंगलट आला. समोरून आलेला फुटबॉल सागरच्या छातीवर जोरात आदळला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मेस्सीचा सामना पाहताना सागर अभ्यास विसरून जायचा. मंगळवारी झालेल्या सामन्यात तो मेस्सीच्या विविध प्रकारच्या किक मारून दाखवणार होता. पण दुर्दैवाने त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती सागरचा भाऊ समर कोयाल याने दिली.