शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

रिकॉर्ड ब्रेक : मँचेस्टर युनायटेडनं ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्वागताची केली पोस्ट अन् मोडला लिओनेल मेस्सीचा विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 2:53 PM

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाना रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( EPL) त्याच्या पूर्वाश्रमिच्या क्लबमध्ये परतला आहे.

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाना रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( EPL) त्याच्या पूर्वाश्रमिच्या क्लबमध्ये परतला आहे. ३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. मँचेस्टर युनायटेडनं सोशल मीडियावर ही घोषणा केली अन् बघताबघता त्यांच्या या पोस्टनं वर्ल्ड रिकॉर्डची नोंद केली. रोनाल्डोच्या आगमनाच्या त्या पोस्टला आतापर्यंत १ कोटी २९ लाख ७,०२२ लाईक्स मिळाले आहेत ( The announcement of Cristiano Ronaldo return by Manchester United on Instagram garnered 12,907,022 likes as of now) एखाद्या क्लबच्या इंस्टाग्राम पोस्टला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत. याआधी अर्जेंटिनाचा लिओनेस मेस्सीच्या स्वागताची पोस्ट पॅरीस सेंट जर्मेन क्लबनं केली होती आणि त्याला ७८ लाख १९,०८९ लाईक्स मिळाले होते. (  Paris Saint-Germain's Lionel Messi announcement video on Instagram had attracted 7,819,089 likes.) 

रोनाल्डोनं २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंटसच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोनं चार चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदं आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात इपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपदं आणि पोर्तुगालकडून एक युरो चषक यांचा समावेश आहे.  

इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या पाच पोस्ट  

  • कोपा अमेरिका चषकासह लिओनेल मेस्सी  ( Lionel Messi with Copa America trophy) - ११ जुलै २०२१मध्ये लिओनेल मेस्सीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कोपा अमेरिका २०२१ चषकासह फोटो पोस्ट केला होता. अर्जेंटिनानं अंतिम सामन्यात ब्राझिलला नमवून २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. मेस्सीचे हे अर्जेंटिनाकडून पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद आहे आणि त्याच्या या पोस्टला २ कोटी १९ लाख ३५,२७३ लाईक्स मिळाले होते. एखाद्या खेळाडूच्या पोस्टला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत

  • ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वाहिली दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली ( Cristiano Ronaldo's tribute to Diego Maradona) - अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे २५ नोव्हेंबर २०२०ला निधन झाले. रोनाल्डोनं त्यांच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट केला आणइ त्याला १ कोटी ९८ लाख ७८,७१७ लाईक्स मिळाले होते.  

  • लिओनेल मेस्सीनं वाहिली मॅराडोना यांना श्रंद्धाजली ( Lionel Messi's tribute to Diego Maradona) - मेस्सीच्या त्या पोस्टला १ कोटी ६४ लाख ०८,४५८ लाईक्स मिळाले.  

  • लेब्रोन जेम्स याची कोब ब्रायंटला श्रंद्धांजली ( LeBron James' tribute to Kobe Bryant) - अमेरिकेचा दिग्गज बास्केटबॉल कोब ब्रायंट याचे २६ जानेवारी २०२०ला निधन झाले. त्याचा LA Lakers क्लबमधील सहकारी लेब्रोन जेम्स यानं केलेल्या पोस्टला १ कोटी ५३ लाख ७४,५७२ लाईक्स मिळाले. 

  • कोब ब्रायंट याची अखेरची इंस्टाग्राम पोस्ट ( Kobe Bryant's last Instagram post before his death) - कोब ब्रायंट याच्या अखेरच्या पोस्टला १ कोटी ४४ लाख ४८,०४० लाईक्स मिळाले.

 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी