भारतीय फुटबॉलसाठी लज्जास्पद! कोच खालिद जमील आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला; कोचीमधील 'पेमेंट' वादाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:29 IST2026-03-27T12:28:32+5:302026-03-27T12:29:42+5:30

Indian Football Team Kochi Controversy: कोचीमध्ये भारतीय फुटबॉल संघाला अपमानास्पद वागणूक. कोच खालिद जमील आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये एन्ट्री नाकारली.

Indian Football Team Kochi Controversy: Shame on Indian football! Coach Khalid Jamil and players denied entry into stadium; Kochi hit by 'payment' controversy | भारतीय फुटबॉलसाठी लज्जास्पद! कोच खालिद जमील आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला; कोचीमधील 'पेमेंट' वादाचा फटका

भारतीय फुटबॉलसाठी लज्जास्पद! कोच खालिद जमील आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला; कोचीमधील 'पेमेंट' वादाचा फटका

भारतीय फुटबॉल क्षेत्रातून एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सरावासाठी आणि पत्रकार परिषदेसाठी गेलेल्या भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि खेळाडूंना सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला. स्टेडियमच्या मालकी हक्क असलेल्या 'ग्रेटर कोचीन डेव्हलपमेंट अथॉरिटी'ने सुरक्षा ठेव भरली नसल्याचे कारण देत हा निर्णय घेतला.

३१ मार्च रोजी होणाऱ्या हाँगकाँगविरुद्धच्या 'एएफसी आशियाई चषक' पात्रता फेरीच्या सामन्यासाठी कोचीमध्ये सराव सुरू आहे. नियमानुसार, केरळ फुटबॉल असोसिएशनला स्टेडियमच्या वापरासाठी २५ लाख रुपये सुरक्षा ठेव आणि ३ लाख रुपये भाडे भरायचे होते. हे पैसे न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी स्टेडियमचे मुख्य गेट उघडण्यास नकार दिला.

प्रशिक्षक आणि खेळाडू ताटकळले
मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्यासह आशिक़ कुरुनियान, सहल अब्दुल समद आणि बिजोय वर्गीस हे खेळाडू स्टेडियमवर पोहोचले होते. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही प्रवेश न मिळाल्याने त्यांना हॉटेलवर परतावे लागले. अखेर भारतीय संघाला स्टेडियमपासून १० किमी दूर असलेल्या केरळ ब्लास्टर्सच्या मैदानावर सराव करावा लागला. या गोंधळामुळे गुरुवारी नियोजित असलेली महत्त्वाची पत्रकार परिषद रद्द करावी लागली. पत्रकार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनाही गेटबाहेरच रोखण्यात आले होते.

AIFF चे स्पष्टीकरण
'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'ने (AIFF) या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. "तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असून, सामन्यापूर्वी सर्व औपचारिकता पूर्ण केली जाईल. ३१ मार्चचा सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होईल," असे AIFF ने स्पष्ट केले आहे.

इतिहास आणि पुन्हा चूक
कोचीमध्ये तब्बल १० वर्षांनंतर भारतीय राष्ट्रीय संघाचा सामना होत आहे. अशा महत्त्वाच्या प्रसंगी प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आल्याने भारतीय फुटबॉलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. यापूर्वी केरळ ब्लास्टर्ससोबतही असाच प्रकार घडला होता.

Web Title : भारतीय फुटबॉल शर्मसार: कोच और खिलाड़ियों को भुगतान विवाद में स्टेडियम में प्रवेश से वंचित।

Web Summary : भारतीय फुटबॉल को शर्मिंदगी का सामना करना पड़ा क्योंकि कोच खालिद जमील और खिलाड़ियों को बकाया राशि के कारण कोच्चि स्टेडियम में प्रवेश से वंचित कर दिया गया। अभ्यास सत्र स्थानांतरित कर दिया गया, और एक प्रेस कॉन्फ्रेंस रद्द कर दी गई। एआईएफएफ ने मैच से पहले समाधान का आश्वासन दिया।

Web Title : Indian football embarrassed: Coach, players denied stadium entry over payment dispute.

Web Summary : Indian football faced embarrassment as Coach Khalid Jamil and players were denied entry to Kochi stadium due to unpaid dues. A practice session was relocated, and a press conference was cancelled. AIFF assured resolution before the match.