अलविदा दोस्त... रोनाल्डोला रेयाल माद्रिदची भावपूर्ण भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 17:06 IST2018-07-12T17:06:12+5:302018-07-12T17:06:46+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे.

अलविदा दोस्त... रोनाल्डोला रेयाल माद्रिदची भावपूर्ण भेट
माद्रिद - ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. त्याने क्लबला अनेक ऐतिहासिक जेतेपद जिंकून दिली आहेत. त्यामुळे रोनाल्डोचा हा निर्णय माद्रिद व त्यांच्या पाठिराख्यांना पटणारा नाही. त्यामुळे त्यांच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर रोनाल्डो युव्हेंट्स क्लबशी करार करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि त्या ख-या ठरल्या. जवळपास 800 कोटी रूपयांच्या करारासह रोनाल्डोने युव्हेंट्सची ऑफर स्वीकारली. 2009 मध्ये मँचेस्टर युनायटेडला सोडून तो माद्रिद क्लबमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 2018 पर्यंत त्याने या क्लबसोबत अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. याच विजयांचे क्षण व्हिडीओच्या माध्यमातून रेयाल माद्रिद क्लबने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून रोनाल्डोला अनोखी भावनिक भेट दिली आहे.
#GraciasCristianopic.twitter.com/VEptaZIlfa
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) July 10, 2018
रोनाल्डोच्या क्लब सोडल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी माद्रिद इडन हॅझार्ड, रोमेलु लुकाकु, कायलीन मॅब्प्पे आदी खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.