France vs Croatia, WC Final : तेव्हा इटलीने मारले तीन मिनीटात दोन गोल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 22:15 IST2018-07-15T22:14:44+5:302018-07-15T22:15:15+5:30
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने संधी न दडवता ४ गोल केले आहेत. त्याचा पाठलाग करताना क्रोएशियाने २ गोल केले आहेत.

France vs Croatia, WC Final : तेव्हा इटलीने मारले तीन मिनीटात दोन गोल्स
ठळक मुद्देअतिरिक्त वेळेच्या अखेरच्या ३ मिनीटात इटलीने दोन गोल डागून जर्मनीला त्यांच्याच घरात मोठा धक्का दिला. पुढे हा विश्वचषक इटलीनेच पटकावला.
मुंबई : फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने संधी न दडवता ४ गोल केले आहेत. त्याचा पाठलाग करताना क्रोएशियाने २ गोल केले आहेत. सामना संपायला १० मिनीटे असताना अद्यापही क्रोएशियाची संधी हुकली नसल्याचे इतिहासावरुन दिसून येत आहे.
The first time since 1958 we've had six goals in regular time of a #WorldCupFinal!
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
Pretty nerve-wracking for #FRA and #CRO fans, but for neutrals... how you feeling? #FRACRO 4-2 pic.twitter.com/lVZ0FXeBUZ
जर्मनीत २००६ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटले व जर्मनी हे दोन बलाढ्य देश एकमेकांसमोर होते. त्यावेळी जर्मनी हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. ९० मिनीटात दोन्ही संघ गोल शून्य असल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला आणि तिथेन जर्मनीचा घात झाला. अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या ३ मिनीटात इटलीने दोन गोल डागून जर्मनीला त्यांच्याच घरात मोठा धक्का दिला. पुढे हा विश्वचषक इटलीनेच पटकावला.