FIFA World Cup 2018 : दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने कुंभमेळ्याला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 23:16 IST2018-06-14T20:47:49+5:302018-06-14T23:16:17+5:30

ब्राझीलचा माजी स्टार खेळाडू रोनाल्डोने मैदानात येऊन फुटबॉलला लाथ मारली आणि विश्वचषकाचा बिगुल वाजला.

FIFA World Cup 2018: world cup starts with a spectacular opening ceremony | FIFA World Cup 2018 : दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने कुंभमेळ्याला सुरुवात

FIFA World Cup 2018 : दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने कुंभमेळ्याला सुरुवात

ठळक मुद्देस्टेडियममधील जवळपास 80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने उद्घाटन सोहळ्याला रंगत चढली

मॉस्को : ज्याची सारे क्रीडा विश्व आतुरतेने वाट पाहत होते, तो फिफा फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा कमी वेळेत चांगलाच रंगला. ब्राझीलचा माजी स्टार खेळाडू रोनाल्डोने मैदानात येऊन फुटबॉलला लाथ मारली आणि विश्वचषकाचा बिगुल वाजला.

स्टेडियममधील जवळपास 80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने उद्घाटन सोहळ्याला रंगत चढली. ब्रिटनचा प्रसिद्ध पॉप गायक रॉबी विल्यम्स आणि रशियाची नामांकित गायिका सोप्रानो एडा गुलिफुलिना यांच्या स्वरांनी उद्घाटन सोहळ्यात बहार आली.


रॉबी विल्यम्सने ट्विट केलेला व्हीडीओ


Web Title: FIFA World Cup 2018: world cup starts with a spectacular opening ceremony