FIFA World Cup 2018: आठ महिन्यांपासून पराभूत होतोय रशियाचा संघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 18:56 IST2018-06-07T18:56:07+5:302018-06-07T18:56:07+5:30
हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही.

FIFA World Cup 2018: आठ महिन्यांपासून पराभूत होतोय रशियाचा संघ
मॉस्को : फुटबॉल विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे यजमान या विश्वचषकात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रशिया आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण सामना खेळवला गेला. हा सामना रशिया सहज जिंकेल, असे वाटत होते. पण या सामन्यात रशियाला तुर्कस्तानबरोबर 1-1 अशी बरोबरी स्वीकारावी लागली. यापूर्वी झालेल्या सात सामन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याचबरोबर गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाची कामगिरी खालावलेली आहे. कारण त्यांना आठ महिन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. यामुळे रशियाचे चाहते निराश झाले आहेत.
रशियाच्या कामगिरीमुळे त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाडू निराशेच्या गर्तेत अडकलेले आहेत. त्यांची जर अशीच कामगिरी सुरु राहिली तर विश्वचषकाच्या साखळी फेरीतच यजमानांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. विश्वचषकात रशियाचा पहिला सामना सौदी अरेबियाबरोबर होणार आहे.