शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

FIFA World Cup 2018 : रशियाचा दणदणीत विजयारंभ; सौदी अरेबियावर 5-0 अशी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:44 PM

आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियाने ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देरशियाचा विश्वचषकातील हा सर्वोत्तम विजय ठरला आहे.

मॉस्को : यजमान रशियाने सलामीच्याच लढतीत दणदणीत विजयारंभ केला. रशियाने पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा सफाईदार विजय मिळवत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियाने ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. त्याचबरोबर रशियाचा विश्वचषकातील हा सर्वोत्तम विजय ठरला आहे.

सामन्याच्या सुरुवातीची 10 मिनिटे सौदी अरेबियाने दमदार खेळ केला. पण सामन्याच्या 12व्या मिनिटाला युरी गॉसिन्सकीने रशियासाठी पहिला गोल केला. आतापर्यंत सहा सामने खेळलेल्या गॉसिन्सकीला आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल करण्यासाठी व्यासपीठ मिळाले ते विश्वचषकाचे. गॉसिन्सकीने रशियाला गोलबोहनी करून दिली.सामन्याच्या 43व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवने रशियासाठी दुसरा गोल केला. डेनिसने मैदानात उतरल्यावर 89व्या सेकंदालाच हा गोल केला. राखीव खेळाडूने विश्वचषकात केलेला हा 2002 सालानंतरचा सर्वात जलद गोल ठरला. त्याचबरोबर विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत गोल करणारा डेनिस हा पहिला राखीव खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या 91 व्या मिनिटालाही डेनिसने अजून एक गोल करत संघाची आघाडी वाढवली. रशियाच्या आट्रेम डीयुबा आणि गोलोव्हिन यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशियाsaudi arabiaसौदी अरेबियाSportsक्रीडा