FIFA World Cup 2018: रोनाल्डोच्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 19:34 IST2018-06-20T19:34:25+5:302018-06-20T19:34:25+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरॅक्कोवर 1-0 असा विजय मिळवला.

FIFA World Cup 2018: रोनाल्डोच्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय
मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरॅक्कोवर 1-0 असा विजय मिळवला. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातील पोर्तुगालचा हा पहिला विजय ठरला. कारण पहिल्या सामन्यात पोर्तुगालने स्पेनबरोबर 3-3 अशी बरोबरी साधील होती.
सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. यानंतर पोर्तुगालने बऱ्याचदा आक्रमणे केली, पण त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही.
Victory for #POR thanks to another goal from @Cristiano! #PORMORpic.twitter.com/lLlQIU7WSt
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 20, 2018
मध्यंतरापर्यंत पोर्तुगालने 1-0 अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्रातही त्यांनी हीच आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात पोर्तुगालवर मोरॅक्कोने जोरदार आक्रमण केले. त्यांनी गोल करण्याचा बऱ्याच संधीही निर्माण केल्या, पण गोल करण्यात मात्र मोरॅक्कोला यश आले नाही.