शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

FIFA World Cup 2018 : किती किलो सोन्याने तयार केली आहे फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी? वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 16:40 IST

वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे. 

मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2018 ला काही दिवसातच मॉस्कोमध्ये सुरुवात होणार आहे. जगभरातील 32 दमदार संघ 14 जूनपासून विश्वविजेता होण्यासाठी पूर्ण अनुभव पणाला लावणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे. 

कधीपासून रंगणार महामेळा?

फिफा वर्ल्ड कप 2018 चं उदघाटन रशिया आणि सौदी अरब यांच्यातील सामन्याने होणार आहे. 14 जूनपासून सुरु होणाऱ्या या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याचं फायनल 15 जुलैला खेळलं जाणार आहे. पण आत्ताच या सोन्याच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे सांगणे कठीण आहे. पण त्याआधी आपण जाणून घेऊ की, या ट्रॉफीमध्ये किती सोनं आहे. 

48 वर्षांआधी 1970 पर्यंत फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 'जूलेस रिमेत ट्रॉफी' ट्रॉफी दिली जायची. पण 70 मध्ये तिनदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलला ही ट्रॉफी कायमची देण्यात आली. 1974 मध्ये वर्ल्ड फुटबॉलची सर्वात मोठी संस्था फिफाने आपल्याच नावाने नवीन ट्रॉफी तयार केली. 

किती आहे सोनं?

या ट्रॉफीची उंची 36 सेंटीमीटर असून ही ट्रॉफी 6 किलो 175 ग्रॅमच्या 18 कॅरेटच्या सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. 

चोरी झाली होती पहिली ट्रॉफी

कोणत्याही विजेत्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. पण ब्राझीलने जेव्हा 1970 मध्ये तिसऱ्यांदा हा किताब मिळवला, तेव्हा त्यांना खरी ट्रॉफी नेहमीसाठी देण्यात आली. ही ट्रॉफी ब्राझील संघाने एका बुलेटप्रुफ कपाटात ठेवली. 1983 मध्ये काही लोकांना ही ट्रॉफी चोरी केली. नंतर याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली होती. पण ती ट्रॉफी पुन्हा मिळाली नाही. असे सांगितले जाते की, ही ट्रॉफी त्या लोकांनी वितळवली आणि सोनं विकलं. त्या ट्रॉफीचा केवळ खालचा भाग मिळाला होता. हा भाग फिफाने आपल्या मुख्यालयात ठेवला होता.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा