शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

FIFA World Cup 2018 : जबरा फॅन, संघाच्या समर्थनासाठी ५१४५ किलोमीटर, ७५ दिवसांचा त्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 7:51 AM

विश्वचषक २०१८ च्या सलामी सामन्यात यजमान रशियाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमविण्याच्या जिद्दीने सौदी अरेबियाचा संघ मैदानात उतरेल तेंव्हा स्टँडस्मध्ये एक चेहरा हमखास दिसेल.

 

विश्वचषक २०१८ च्या सलामी सामन्यात यजमान रशियाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमविण्याच्या जिद्दीने सौदी अरेबियाचा संघ मैदानात उतरेल तेंव्हा स्टँडस्मध्ये एक चेहरा हमखास दिसेल. तो असेल फहद् अल् याह्या याचा. हजारो प्रेक्षकांमध्ये याच एकाच विशेष उल्लेख करायचा तो यासाठी की हा फहद् हा सौदी संघाचा काही साधासुधा फॅन नाही तर जबरा फॅन आहे. आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी तो थोडथोडका नाही तर ५,१४५ किलोमीटरचा प्रवास करून रशियात आलाय आणि तेसुद्धा विमानाने नाही तर सायकलीने...होय! चक्क सायकलीने तो चार देशांच्या सीमा पार करत सौदीतून रशियात मॉस्कोला आलाय. या प्रवासासाठी त्याला ७५ दिवस लागले. यादरम्यान त्याचा एका ट्रकसोबत किरकोळ अपघातसुद्धा झाला. त्यात त्याच्ळा डोक्याला आणि पाठीला किरकोळ मारसुद्धा लागला पण फहद्ने परतीची वाट न धरता नेटाने मार्गक्रमण सुरुच ठेवले. या धाङसाबद्दल हा २८ वर्षीय फुटबॉलवेडा सांगतो, ‘रियाध प्रांताचे राजकुमार फैझल अब्दुलअझीझ यांनी माझ्याकडे राष्टध्वज सोपवला आणि तो मी इथपर्यंत घेऊन आलोय.  आमच्या संघाला समर्थंन देण्यासाठी मी एवढ्या लांबवर आलोय. त्याने आपल्या संघाचे रशियात तळ असणाया सेंट पिटर्सबर्ग येथे संघाची भेटसुद्धा घेतली आणि तेथे त्याच्या निर्धाराचे कौतुक करत सौदी अरबियन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अदेल एझ्झाट यांनी त्याचे स्वागत केले. आता इकडून परतीचा प्रवासही सायकलीनेच का?  या प्रश्नाच्या उत्तरात हसत हसत फहद् म्हणाला की, नाही, आता परतताना मात्र विमानाने रियाधला जाईन. फहद् परतताना भलेही विमानाने जावो, पण त्याच्या या फुटबॉलप्रेमाला आणि त्या प्रेमापोटी केलेल्या सायकलवारीला तोड नाही हे मात्र खरे!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाFootballफुटबॉलsaudi arabiaसौदी अरेबिया