शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Fifa World Cup 2018: तब्बल 40 वर्षानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये 'असं' घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 1:31 PM

ब्राझीलच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली

मॉस्को: फिफा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या ब्राझीलच्या संघाला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बरोबरीत रोखलं. स्वित्झर्लंडनं ब्राझीलला 1-1 असं रोखत सामना बरोबरीत सोडवला. यामुळे फिफा वर्ल्ड कपची सुरुवात विजयानं करण्याची ब्राझीलची संधी हुकली. विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षानंतर ब्राझीलच्या संघाला फिफाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. ब्राझीलचा संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये नेहमीच दमदार कामगिरी करतो. 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1978 मध्ये ब्राझीलला सलामीच्या सामन्यात स्वीडननं 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. यानंतर तब्बल 40 वर्षांनंतर ब्राझीलला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघानं बरोबरीत रोखलं. ब्राझीलनं विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बरोबरी पत्करण्याची ही केवळ तिसरी वेळ ठरली. 1974 च्या विश्वचषकात युगोस्लावियानं ब्राझीलला गोलशून्य बरोबरीत रोखलं होतं. यानंतर 1978 मध्ये स्वीडननं ब्राझीलला 1-1 असं बरोबरीत रोखलं. आता तब्बल 40 वर्षानंतर स्वित्झर्लंडनं ही कामगिरी करुन दाखवली.आतापर्यंत झालेल्या विश्वचषक सामन्यातील ब्राझीलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास ब्राझीलचा संघ 21 विश्वचषक स्पर्धा खेळला आहे. यापैकी 16 स्पर्धांची सुरुवात ब्राझीलनं पहिला सामना जिंकून केली. तर तीनवेळा त्यांना बरोबरीवर समाधान मानावं लागलं. आतापर्यंत दोनवेळा (1930 आणि 1934 मध्ये) ब्राझीलला सलामीच्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाBrazilब्राझीलSwitzerlandस्वित्झर्लंडSportsक्रीडा