शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:53 IST

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे

नवी दिल्ली - १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं कोलंबियाला चांगलीच टक्कर दिली. कोलंबियानं पहिला गोल करत भारतीय संघावर दडपण निर्माण केलं. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताचा एकतर्फी पराभव होईल असे वाटत असतानाच भारतानं गोल नोंदवत सामन्यात बरोबरी केली. मात्र पुढच्याच क्षणाला कोलंबियानं गोल नोंदवत भारतावर आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत भारताला संधी दिली नाही. आणि भारतानं हा सामना 2-1 अशा फरकानं गमावला.  लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यामुळे या स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे. साखळी फेरीत भारत आपला शेवटचा सामना घानाविरुद्ध 12 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यामुळे आपला शेवटचा सामना जिंकून भारत या स्पर्धेचा शेवट गोड करतो का हे पहावं लागणार आहे.पहिल्या सत्रात भारतीय संघाने कोलंबियाच्या संघाला चांगलच झुंजवलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आलं. कोलंबियाच्या खेळाडूंनी केलेलं आक्रमण यजमान संघाचा गोलकिपर धीरज सिंहने मोठ्या शिताफीने परतवून लावलं. पहिल्या सत्रात कोलंबियाच्या संघाला एकही गोल करु न देण्यात धीरज सिंहचा मोठा वाटा होता. त्याने कोलंबियाच्या खेळाडूंनी मारलेले सुरेख फटके गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखले. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनीही कोलंबियावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न हे फोल ठरले.मात्र दुसऱ्या सत्रात कोलंबियाच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमणात आणखी धार आणत 48 व्य़ा मिनीटाला आपला पहिला गोल झळकावला. ज्युआन पेनालोझाने पहिला गोल झळकावत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या आक्रमणामुळे भारतीय संघ काहीसा बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला. यानंतर भारतीय संघाने कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधवला संघात जागा दिली. मात्र भारतीय खेळाडूंना गोल करण्यात यश येत नव्हतं. अखेर 82 व्या मिनीटाला जॅक्सन सिंहने ही कोंडी फोडत हेडरवर सुरेख गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. हा भारताचा विश्वचषक स्पर्धेतला पहिला गोल ठरला.मात्र यानंतर अवघ्या एका मिनीटाच्या आत भारतीयांच्या आनंदावर विरझण पडलं. पहिल्या गोलनंतर जल्लोषात रमलेल्या भारतीय खेळाडूंचा फायदा उचलत कोलंबियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर आक्रमण केलं. 83 व्या मिनीटाला ज्युआन पेनालोझाने सामन्यात आणखी एक गोल झळकावत कोलंबियाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या गोलदरम्यान भारताच्या बचावफळीचा एकही खेळाडू आपल्या जागेवर हजर नव्हता. याचा फायदा उचलत कोलंबियाने पुन्हा एकदा सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

टॅग्स :Footballफुटबॉल2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017