FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:25 AM2017-10-07T03:25:46+5:302017-10-07T03:26:48+5:30

भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि...

FIFA U-17 World Cup: Even after the defeat against the United States, the Indian team won | FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

Next

नवी दिल्ली : भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि, पराभवानंतरही भारतीय संघाने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघही बनवत इतिहास रचला.

अमेरिकेकडून कर्णधार जोश सार्जेंटने पेनल्टीवर ३१ व्या मिनिटाला, ख्रिस डॉर्किनने ५२ व्या आणि अँड्र्यू कार्लटन याने ८४ मिनिटाला गोल केले.
स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही आणि जसा चेंडू भारतीय खेळाडूंजवळ आला तसे त्यांना प्रेक्षकांचा जास्त पाठिंबा मिळत होता. त्याचा परिणाम खेळाडूंवरदेखील झालेला दिसला. भारतीय खेळाडूदेखील आपल्या पालक आणि प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करू इच्छित होते. त्यात गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्याशिवाय कोमल थाटल आणि सुरेश वांगजाम व फॉरवर्ड अनिकेत जाधव यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली.

सामन्याच्या प्रारंभीच गोलरक्षक धीरजने अमेरिकेचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. १५ व्या मिनिटाला मिडफिल्डर अँड्र्यू कार्लटनने मारलेल्या फटक्याचा धीरजने सुरेख बचाव केला. पाच मिनिटांनंतर राहुल कनोली याने अमेरिकेचा गोल करण्याचा प्रयत्न रोखला. तथापि, भारतीय खेळाडूच्या चुकीने अमेरिकेला पेनल्टी मिळाली आणि त्यावर जोश सार्जेंट याने गोल करीत अमेरिकेला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. ४३ व्या मिनिटाला अनिकेत जाधवला २५ यार्डवरून गोल करण्याची संधी मिळवली; परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. पूर्वार्धात अमेरिकेने १-0 अशी आघाडी घेतली; परंतु उत्तरार्धात त्यांनी सुरुवातीलाच आक्रमकता दाखवली. तथापि, अमेरिकेसाठी दुसरा गोल ५१ व्या मिनिटाला ख्रिस डॉर्कीन याने केला. त्यानंतर थाटलने दमदार फटका मारला; परंतु गोलरक्षक जस्टिन गार्सेस याला चकवण्यात त्याला यश मिळाले नाही. पुढच्याच मिनिटाला कार्लटनने गोल करीत अमेरिकेची आघाडी ३-० ने वाढवली. आता भारतीय संघ ९ आॅक्टोबरला कोलंबिया संघाविरुद्ध दोन हात करील.

Web Title: FIFA U-17 World Cup: Even after the defeat against the United States, the Indian team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.