FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडवर विजयासह बेल्जियम अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 01:26 IST2018-06-29T01:26:05+5:302018-06-29T01:26:12+5:30

इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवत बेल्जियमने ' जी ' गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

FIFA Football World Cup 2018: Belgium tops with victory over England | FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडवर विजयासह बेल्जियम अव्वल

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडवर विजयासह बेल्जियम अव्वल

ठळक मुद्देबेल्जियमला आता जपानशी सामना करावा लागेल. इंग्लंडला या पराभवामुळे दुसरे स्थान मिळाले असून त्यांना बाद फेरीत कोलंबियाचा सामना करावा लागेल.

मॉस्को : इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवत बेल्जियमने फुटबॉल विश्वचषकातील ' जी ' गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता त्यांना जपानशी सामना करावा लागेल. इंग्लंडला या पराभवामुळे दुसरे स्थान मिळाले असून त्यांना बाद फेरीत कोलंबियाचा सामना करावा लागेल.


पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात मात्र अपयश आले. त्यामुळे पहिल्या सत्रात हा सामना गोलशून्य बरोबरीत होता. पण सामन्याच्या 51 व्या मिनिटाला जानूझाजने गोल करत बेल्जियमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत बेल्जियमने इंग्लंडवर विजय मिळवला.

Web Title: FIFA Football World Cup 2018: Belgium tops with victory over England