Fifa football world cup 2018: रोनाल्डोला मिळालेली ऑफर ऐकून चक्रावाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:47 IST2018-07-05T16:44:49+5:302018-07-05T16:47:37+5:30
फुटबॉल विश्वचषकात मात्र रोनाल्डोचा जलवा चालला नाही. रोनाल्डोला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात रोनाल्डोला अपयश आलं. हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलं जात असून त्याला कधीही विश्वचषक पटकावता येणार नाही, असंही बोललं गेलं.

Fifa football world cup 2018: रोनाल्डोला मिळालेली ऑफर ऐकून चक्रावाल
माद्रिद : ख्रिस्तियानो रोनाल्डो... बऱ्याच फुटबॉल चाहत्यांच्या मनातील ताईत. पण फुटबॉल विश्वचषकात मात्र रोनाल्डोचा जलवा चालला नाही. रोनाल्डोला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात रोनाल्डोला अपयश आलं. हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलं जात असून त्याला कधीही विश्वचषक पटकावता येणार नाही, असंही बोललं गेलं. पण तरीही फुटबॉल विश्वातील त्याच्या नावाला कुठलाच धक्का लागलेला नाही. उलटपक्षी रोनाल्डोला आता एका क्लबकडून फार मोठी ऑफरही मिळाली आहे. या ऑफरमधली रक्कम ऐकली तर तुम्ही चक्रावून जालं.
आयपीएलमध्ये एका खेळाडूला जास्तीत जास्त १५ कोटी रुपये मिळतात, तर एका संघाची बांधणी करायला साधारण ३५० ते ५०० कोटी रुपये लागतात. पण आयपीएलमध्ये एका संघासाठी लागणाऱ्या रक्कमेपेक्षाही रोनाल्डोला मिळालेली ही ऑफर कितीतरी पटीने जास्त आहे.
रोनाल्डो हा स्पेनमधील रियल माद्रिद क्लबचा अव्वल खेळाडू आहे. या क्लबकडून खेळताना त्याने ४५१ गोल केले आहेत. माद्रिद क्लबला त्याने पाचवेळा जेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. पण विश्वचषकात मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण तरीही जुवेंट्स या क्लबने त्याला एक मोठी ऑफर दिली आहे. आपल्या क्लमध्ये सामील होण्यासाठी जुवेंट्स क्लबने रोनाल्डोला दिले आहेत तब्बल आठ अब्ज रुपये. हे सारे ऐकून चक्रावला असाल. पण ही गोष्ट खरी आहे. हा जुवेंट्स क्लबचा सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जात आहे. पण रोनाल्डो रियल माद्रिद या क्लबला सोडून जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.