रोनाल्डोच्या नव्या इनिंग्जसाठी फेसबुक सज्ज, पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण चकटफू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:43 IST2018-08-07T16:43:23+5:302018-08-07T16:43:39+5:30

पोर्तुगालचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून इटालियन क्लब युव्हेंटससोबत करार केला.

Facebook ready for Ronaldo's new innings | रोनाल्डोच्या नव्या इनिंग्जसाठी फेसबुक सज्ज, पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण चकटफू!

रोनाल्डोच्या नव्या इनिंग्जसाठी फेसबुक सज्ज, पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण चकटफू!

मुंबई - पोर्तुगालचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून इटालियन क्लब युव्हेंटससोबत करार केला. त्यामुळे 2018-19च्या मोसमात रोनाल्डो युव्हेंटसकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्या या नव्या इनिंग्जची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यासाठी फेसबुकही सज्ज झाले आहे. 

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर रोनाल्डोने विश्रांती घेतली होती. मात्र, आता तो युव्हेंटसकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. युव्हेंटसकडून त्याचा पहिला सामना फेसबुक मोफत प्रक्षेपित करणार आहे. रोनाल्डो 18 ऑगस्टला पहिला सामना खेळणार आहे. 



''फेसबुक हे आमचे पार्टनर आहेत. नेटीझन्सना आपल्याकडे वळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. भविष्यात सोशल मीडियावर अनेक सामने थेट प्रक्षेपित केले जातील, त्यादृष्टीने हे पहिले पाऊल म्हणा,'' अशी प्रतिक्रिया इलेव्हन स्पोर्ट्सचे डॅनी मेकेंन यांनी दिली.  

Web Title: Facebook ready for Ronaldo's new innings