EVERTON ace Andre Gomes ‘lose his mind’; he pays tribute Hollywood star Tom Hanks's after coronavirus diagnosis svg | Coronavirus : आयसोलेशनमुळे फुटबॉलपटूची झाली अशी अवस्था; जाणून घ्या व्हायरल सत्य...

Coronavirus : आयसोलेशनमुळे फुटबॉलपटूची झाली अशी अवस्था; जाणून घ्या व्हायरल सत्य...

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. त्यामुळे अनेक खेळाडू एकांतवासात गेले आहेत. त्यांचा दैनंदिन दिनक्रमही बदलला आहे. त्यांना घराबाहेर पडताच येत नाही. अनेक फुटबॉलपटू या काळाचा वापर कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी करत आहेत. पण, काहींचे मानसिक संतुलन बिघडल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एका मानसोपचार तज्ज्ञानं फुटबॉलपटू सध्या कुठल्या मानसिक स्थितीतून जात आहेत, याचे धक्कादायक वास्तव समोर आणले होते. ( ...म्हणून आयसोलेशनमधील 'त्या' फुटबॉलपटूनं पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवले! ). त्यात आखणी एका फुटबॉलपटूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

एव्हर्टन क्लबचा फुटबॉलपटू आंद्रे गोमेजनं शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात गोमेस एखाद्या धक्का बसलेल्या व्यक्तीप्रमाणे शांत बसला आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन हरवले की काय, अशी चर्चा रंगू लागली. पण, तसे काहीही नाही. त्यानं Cast Away या हॉलिवूड चित्रपटातील एक प्रसंगाची अॅक्टींग करून दाखवली आहे. Cast Away या चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार विजेता नायक टॉम हंक याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हंक याला २०००मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्याच्यासह त्याची पत्नी रिटा विल्सन हिलाही कोरोना लागण झाली आहे आणि त्या दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. Cast Away या चित्रपटातील हंक याची भूमिका प्रचंड गाजली होती. त्या चित्रपटात विमान अपघातानंतर हंक हा एका बेटावर एकटाच अडकतो. तेव्हा एकांतवास घालवण्यासाठी तो एका व्हॉलिबॉलला मित्र बनवतो आणि त्याच्याशी गप्पा मारून दिवस ढकलतो. 
गोमेजनं त्या चित्रपटातील एका प्रसंगावर अॅक्टींग केली आहे आणि त्यातून त्यानं हंक व त्याच्या पत्नीच्या तंदुरुस्तीची प्रार्थना केली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असल्यामुळे त्यालाही हंकसारखी अवस्था झाल्यासारखे वाटत आहे. 

पाहा व्हिडीओ...


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!

Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

Corona Virus : विरुष्काचं लोकांना महत्त्वपूर्ण आवाहन; पाहा व्हिडीओ

बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!

No Gym नो फिकर... तंदुरुस्तीसाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा हटके व्यायाम, पाहा व्हिडीओ

Web Title: EVERTON ace Andre Gomes ‘lose his mind’; he pays tribute Hollywood star Tom Hanks's after coronavirus diagnosis svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.