होऊ दे खर्च! लेकीचा पहिला वाढदिवस रोनाल्डोनं केला दणक्यात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:10 IST2018-11-15T15:05:30+5:302018-11-15T15:10:36+5:30

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे.

Cristiano Ronaldo spends Rs 25 lakh on 2 wine bottles in London, celebrates daughter's first birthday in style | होऊ दे खर्च! लेकीचा पहिला वाढदिवस रोनाल्डोनं केला दणक्यात साजरा

होऊ दे खर्च! लेकीचा पहिला वाढदिवस रोनाल्डोनं केला दणक्यात साजरा

ठळक मुद्देजगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आलामुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं केलं दणक्यात सेलिब्रेशनखरेदी केल्या 25 लाख किंमत असलेल्या दोन वाईन बॉटल्स

लंडन : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे रेयाल माद्रिदकडून युव्हेंटस क्लबकडे जाणे, नव्या क्लबसोबतची कामगिरी, त्यात लैंगिक अत्याचाराचा आरोप, या ना त्या कारणाने तो गेल्या महिन्याभरात सतत चर्चेत राहिला आहे. यावेळी मात्र एका सकारात्मक गोष्टीमुळे त्याची हवा आहे. लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने दोन वाईन बॉटल्सवर केलेल्या खर्चामुळे ही चर्चा आहे.

युव्हेंटसचा हा स्टार खेळाडू सध्या कुटूंबासोबत लंडन दौऱ्यावर आहे. गल्फ्रेंड जॉर्जिया रॉड्रीग्ज आणि आठ वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो रोनाल्डो ज्युनियर यांच्यासह तो लंडन दौऱ्यावर आहे. तेथे त्याने नोव्हाक जोकोव्हिच आणि जॉन इस्नर यांच्यातील टेनिस सामन्याचाही आस्वाद लुटला. त्यानंतर रोनाल्डोने 25 रुपयांच्या किमतीच्या वाईनच्या दोन बॉटल्स विकत घेऊन सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशन मागचं कारण ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल... 



मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोनाल्डोने हे सेलिब्रेशन केलं होतं. रोनाल्डो भलताच आनंदात होता.. त्याची मुलगी अॅलेना मार्टिना दुसऱ्या वर्षात पदार्पण करत होती. रोनाल्डो आणि जॉर्जिया यांनी हा खास दिवस दणक्यात साजरा केला. 

केवळ पंधरा मिनिटांच्या सेलिब्रेशनसाठी रोनाल्डोने 25 लाख रुपये खर्च केले. युएफा नेशन्स लीगमध्ये होणाऱ्या इटली आणि पोलंड या संघांविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोचा पोर्तुगाल संघात समावेश नाही. 

Web Title: Cristiano Ronaldo spends Rs 25 lakh on 2 wine bottles in London, celebrates daughter's first birthday in style