राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 11:39 IST2018-07-20T11:39:02+5:302018-07-20T11:39:20+5:30

ग्रीक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या आकड्यावर हॉटेल कर्मचा-यांना अजूनही विश्वास बसत नाही.

Cristiano Ronaldo leaves whopping £17,850 tip at Greek hotel | राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

ठळक मुद्दे रोनाल्डोने चक्क 17850 पाऊंड ( 16 लाख रूपये ) टिप दिली. आठवड्याला 5 लाख पाऊंट पगार कमावणारा रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.

युव्हेंट्स - ग्रीक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या आकड्यावर हॉटेल कर्मचा-यांना अजूनही विश्वास बसत नाही. पोर्तुगाल संघाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर पोर्तुगाल संघाचा हा प्रमुख खेळाडू परिवारासह सुट्टीसाठी ग्रीकमध्ये गेला. येथे राहत असलेल्या हॉटेलमधील कर्मचा-यांच्या सेवेवर खुश होताना रोनाल्डोने चक्क 17850 पाऊंड ( 16 लाख रूपये ) टिप दिली. आठवड्याला 5 लाख पाऊंट पगार कमावणारा रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.
उरूग्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीगेज आणि मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आणि मित्रांसह ग्रीकमध्ये दाखल झाला. त्याने या सर्वांसोबत डिनर करत असलेला फोटो समाज माध्यमावर पोस्ट केला होता.  तेथूनच तो युव्हेंट्स क्लबसोबत करार करण्यासाठी इटलीत दाखल झाला. मात्र हॉटेल सोडण्यापूर्वी त्याने सर्व कर्मचा-यांना खुश केले. कर्मचा-यांच्या कामावर रोनाल्डो भलताच खुश झाला होता आणि त्याने पाच आकड्यांची टिप त्यांना आपसात वाटून घेण्यास सांगितली. 


Web Title: Cristiano Ronaldo leaves whopping £17,850 tip at Greek hotel