रोनाल्डोची रिप्लेसमेंट करणार चेल्सीचा हा स्टार खेळाडू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:01 IST2018-07-21T13:46:33+5:302018-07-21T14:01:00+5:30

युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि  रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती.

Chelsea's star player will make Ronaldo replacement ? | रोनाल्डोची रिप्लेसमेंट करणार चेल्सीचा हा स्टार खेळाडू?

रोनाल्डोची रिप्लेसमेंट करणार चेल्सीचा हा स्टार खेळाडू?

मुंबई - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी चढाओढ सुरू झाली आहे. युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि  रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती. पण, याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी बेल्जियमचा कर्णधार आणि चेल्सीच्या स्टार खेळाडूशी रेयालने सुरू केलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 
विश्वचषक स्पर्धेतील बेल्जियमच्या स्वप्नवत वाटचालीला उपांत्य फेरीत फ्रान्सने ब्रेक लावला. त्यानंतर बेल्जियमचा कर्णधार इडन हॅझार्डने रेयाल माद्रिद क्लबकडून खेळणार असल्याचे संकेत दिले होते. तो म्हणाला, चेल्सीसोबतच सहा वर्षांचा अविस्मरणीय प्रवास सोडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर मी दुस-या क्लबच्या शोधात होतो. नव्या क्लबसोबत जायचे की नाही हा निर्णय मी घेणार आहे, परंतु अंतिम निर्णय हा चेल्सी क्लबचा असेल. मला नक्की कुठे जायचे आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच. 



ले 10 स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार रेयाल माद्रिद आणि चेल्सी यांच्यात हॅझार्डसाठी 190 कोटी युरोचा करार झाला आहे. चॅम्पियन्स लीगमधील गतविजेत्या रेयालने हॅझार्डच्या वडीलांसोबत करारासंदर्भात चर्चा केली आहे आणि त्याचवेळी त्यांनी चेल्सीसोबतही वाटाघाटीला सुरूवात केलेली आहे. इटलीमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हॅझार्डचे वकील, वडील आणि रेयाल यांच्यात बैठक झाली असून रेयालने 125 कोटी युरोची ऑफर दिल्याचे समोर येत आहे. 
चेल्सीचा सहकारी चेस फॅब्रेगासने हॅझार्डला भावनिक आवाहन केले आहे. तो म्हणाला, हॅझार्ड हा आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. इंग्लिंश प्रीमिअर लीगमधील आमच क्लब सर्वोत्तम आहे आणि पुढील सत्रातही यात सातत्य राखायचे आहे. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळाडू हवेत, त्यापैकी हझार्ड हा एक आहे. त्याच्यासोबत मला खेळायला आवडते. 

Web Title: Chelsea's star player will make Ronaldo replacement ?