शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी हे उपाय करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:51 PM

दूध न पिण्याची वास, चव,पचनसंबंधीची वेगवेगळी कारणं पुढे करून आपण दूध टाळत असतो. पण दूध पिण्याचं टाळताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण दूधातून मिळणा-या पोषकतेलाही नाकारत असतो. दूध पिताना त्यात काही गोष्टी जर मुद्दाम घातल्या तर दूध आवडीनं प्यायलं जातं शिवाय दूधातून                    मिळणा-या पोषणमूल्याचीही वाढ होते.

ठळक मुद्दे* दूध आणि मध हे वाढत्या वयाच्या मुलांना नेहमी द्यायला हवं असं कॉम्बिनेशन आहे.* वाढत्या मुलांबरोबरच महिलांसाठीही दूध-खारीक हा पौष्टिक आहाराच्या यादीत वरचे स्थान पटकावितो.* जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, किंवा मग तुम्ही वारंवार सर्दीमुळे त्रस्त असाल तर मग तुळशीची पानं घालून उकळलेलं दूध पिणं हा सर्वात उत्तम उपाय आहे.

 

- सारिका पूरकर-गुजराथीदूध.आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा घटक मानला गेला आहे. कॅल्शियमचा खजिना म्हणूनही दूधाची ओळख करु न दिली जाते. कारण दिवसभरासाठी आपल्या शरीराला आवश्यक असणा-या कॅल्शियमच्या कोट्यातील 45 टक्के कोटा हा केवळ दुधामुळे कव्हर होतो. तर असे हे बहुमूल्य दूध, आपण रोज म्हणजे अगदी न चुकता एक तर सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा रात्री झोपताना तरी घ्यायला हवं.

परंतु, आपण सगळे कितीजण हा नियम पाळतो? दूध न पिण्याची वास, चव,पचनसंबंधीची वेगवेगळी कारणं पुढे करून आपण दूध टाळत असतो. पण दूध पिण्याचं टाळताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण दूधातून मिळणा-या पोषकतेलाही नाकारत असतो. दूध पिताना त्यात काही गोष्टी जर मुद्दाम घातल्या तर दूध आवडीनं प्यायलं जातं शिवाय दूधातून मिळणा-या पोषणमूल्याचीही वाढ होते.नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी1) दूध-जायफळ पावडर : दूधामध्ये अमिनो अ‍ॅसिड ट्रिपोफॅम हा घटक असतो. या घटकामुळे आपल्या झोपेसाठी आवश्यक समजली जाणारी मेंदूतील काही रसायनांची ( सेराटोनिन व मेलाटोनिन ) निर्मिती होते. आणि जर तुम्ही दूधात जायफळ पावडर घालून दूध प्यायलात तर जायफळामुळे ही रसायनं अधिक प्रमाणात तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळू शकते. फक्त प्रमाणातच जायफळ पूड वापरली जायला हवी.2) दूध -मध- वाढत्या वयाच्या मुलांना नेहमी दिले पाहिजे असे हे कॉम्बिनेशन आहे. कारण यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यांना ताकद देखील येते.याव्यतिरिक्त दूध-मधाच्या सेवनामुळे चांगलं पचन होऊन शरीराचं पोषणही उत्तमरित्या होतं.

 

3) दूध-खारीक - लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कल्शियम हे एकत्रित हवं असेल तर दूध-खारीकला आजघडीलाही दुसरा पर्याय नाही. वाढत्या मुलांबरोबरच महिलांसाठीही दूध-खारीक हा पौष्टिक आहाराच्या यादीत वरचे स्थान पटकावितो. शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करणा-यासाठीही हा उपाय वरदान ठरतो. त्यामुळे दूधाबरोबर खारीक ट्राय कराच.4) दूध-हळद - भारतात आई-आजी यांच्या औषधी बटव्यातील सर्वात जुना प्रभावी नुसका. हळद ही जंतूनाशक असल्यामुळे ती दूधात घालून देण्याची खूप चांगली प्रथा आपल्याकडे आढळते. दूधात हळद घालून प्यायल्यामुळे कोरडा खोकला, कफ या विकारात लाभ होतोच शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीरातील काही उपद्रवी घटकांचा सफाया देखील यामुळे होतो. कर्करोग प्रतिबंधक म्हणूनही हळद ओळखली जाते. शिवाय हळदीचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे दूधात हळद घालून प्यायला सुरूवात करायला हवी.5) दूध-बदाम :- दूधात कॅल्शियम तर बदामात प्रोटीन, व्हिटॅमिन, कल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सारं काही मिळतं. तर मग हे दोन्ही घटक एकत्र केले तर मिळणा-या गुणांमध्ये दुपटीनं वाढ होते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी तर बदामाइतकं दुसरं फायदेशीर काही नाही. हाडांचा बळकटपणा, रक्तदाब,पचनक्रिया हे जर सुरळीत ठेवायचे असेल तर दूध-बदाम बेस्ट पर्याय आहे.

6) दूध-तुळस-काळी मिरी - जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, किंवा मग तुम्ही वारंवार सर्दीमुळे त्रस्त असाल तर मग तुळशीची पानं घालून उकळलेलं दूध पिणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. दूूधात तुळशीची पानं घालून एक उकळी आली की मग थोडी काळीमिरी पावडर घालावी . दुधातील या घटकांमुळे शरीरातील विषारी जीवाणूंचा नायनाट होतो तसेच सर्दीमुळे होणा-या कफ, खोकल्यालाचा त्रासही कमी होतो.7) दूध-मिक्स मसाला : नाही, हे कोजागिरीचं मसाला दूध नाहीये तर हे आरोग्यवर्धक मसाला दूध आहे. जायफळ, लवंग, वेलदोडे, दालचिनी, सुंठ, काळीमिरी एकत्र बारीक करून हा मसाला दूधात घालून दूध उकळल्यास दूध चविष्ट आणि पौष्टिक होतं.8) दूध-केशर - थंडीच्या दिवसात शरीरास गरम ठेवायचं असेल तर केशर घातलेलं दूध घ्यायला हवं.9) दूध प्यावं उकळून: आपण दूध आणलं की आधी ते तापवतो. अनेक घरात सहसा एकदाच दूध तापवलं जातं. परंतु, नॅशनल डेअरी डेव्हलपमेण्ट बोर्डचा अभ्यास सांगतो की तसं न करता दूध दिवसभरातून तीनवेळा तापवलं तरच त्यातील बॅक्टेरिया निघून जाऊन त्यातील आरोग्यदायी घटकाचा लाभ आपल्याला मिळतो.