चवीला एकदम बढीया ; करून बघा मेथी मुठीया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 11:05 IST2020-01-22T11:01:59+5:302020-01-22T11:05:01+5:30
हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका.

चवीला एकदम बढीया ; करून बघा मेथी मुठीया
पुणे : हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका.
साहित्य :
- २ कप बारीक चिरलेली मेथीची पाने
- २ चमचे दही
- २ चमचे बेसन
- २ चमचे तांदूळ पिठ
- २ चमचे गव्हाचे पिठ
- १ चमचा तेल
- ३-४ लसूण पाकळ्यांची पेस्ट
- १ चमचा ओवा
- १ चमचा तिळ
- १ चमचा जिरे
- चवीपुरते मिठ
- तळण्यासाठी तेल
कृती:
- मेथी धुवून, बारीक चिरून घ्यावी.
- त्यात सगळी पीठे, तीळ, जिरे, ओवा, मीठ, लसूण पेस्ट घालून लावून घ्यावे.
- कोरडे वाटल्यास दही वापरावे.
- या पीठाचे लांबट गोळे करून घ्यावे.
- हे गोळे चाळणीत किंवा कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यावेत.
- आता हे गोळे थंड झाल्यावर गरम तेलात तळून घ्या.
- गरमागरम मेथी मुठिया सर्व्ह करा.
- हे मुठिया नुसते छान लागतातच पण टोमॅटो, शेजवान सॉस, चिंचगूळाची चटणी यासोबतही रुचकर लागतात.